Headlines

Vinayak raut granted relief by court interim bail approved in serious allegations of harassment; सुनेचे गंभीर आरोप अन् अटकेची टांगती तलवार; अखेर विनायक राऊत यांना कोर्टाचा मोठा दिलासा


महेश गायकवाड, ठाणे: कौटुंबिक छळाच्या गंभीर आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अडचणीत आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि इतर आरोपी अशा एकूण आठ जणांना ठाणे न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व आरोपींचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

कौटुंबिक कलहातून राऊत कुटुंबीयांवर गंभीर आरोप झाले होते. या आरोपानंतर विनायक राऊत, त्यांची पत्नी शामल, नगरसेवक मुलगा गीतेश, चंद्रकांत राऊत उर्फ आबा राऊत, फिरोज बाबा, काझी बाबा, हरिश्चंद्र घाडी या सात जणांविरुद्ध १० जून रोजी ठाण्यातील कापुरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. संबंधितांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. या गुन्ह्यात पोलिसांनी फिरोज शेख आणि राम वडार यांना अटक केली होती. तर, अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राऊत कुटुंबीय, त्यांचे इतर नातेवाईक यांच्यासह घाडी, शौकत जफर काझी या आठ आरोपींनी ठाणे न्यायालयात अर्ज केले होते.

या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तर, तक्रारदार यांच्या बाजूने ॲड.. सागर कदम यांनी बाजू मांडली. शुक्रवारी न्यायालयाने आदेश देत आठही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. न्यायालयाने आरोपपत्र दाखल होईपर्यंत गीतेश राऊत यांनी प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत कापुरबावडी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर, विनायक राऊत, त्यांची पत्नी आणि अन्य दोन नातेवाईक (दाम्पत्य) यांनीही आरोपपत्र दाखल होईपर्यंत आवश्यकता भासल्यास पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी घाडी, काझी यांनाही आरोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या २ तारखेला सकाळी १० ते ११ या वेळेत पोलिस ठाण्यात उपस्थित राहावे लागणार आहे. चंद्रकात राऊत यालाही तपास अधिकाऱ्याच्या निर्देशानंतर पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी तक्रारदार असलेल्या राऊत यांच्या सुनेकडून उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत