साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ पाहायला मिळतेय. म्हणजे अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी ६२ ते ६५ रुपये प्रति किलो असणारा साखरेचा दर आता थेट 80 रुपयांवर जाण्याची शक्यता दुकानदारांनी वर्तवली आहे. दरम्यान या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत असून ऐन सणासुदीच्या काळात ही दरवाढ होत असल्यानं सामान्य नागरिकांना सणासुदीच्या काळात या साखरेचा गोडवा आता कमीच जाणवण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारनं आता वाढत्या भावावर अंकुश लावण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख कच्ची साखर आयातीला परवानगी दिली आहे. बरं ही आयात कशी राहणार तर, शुल्कमुक्त असणार आहे. भारताच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या भावात लगेच ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान या सगळ्या गोष्टीत साखरेचा भाव एवढा का वाढला हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं कारण आहे, इथेनॉल निर्मिती. तेव्हा साखरेचे भाव वाढण्यामागे मुख्य कारण असलेल्या इथेनॉल निर्मितीसह इतर कोणती महत्त्वाची कारणं आहेत, गेल्या दोन महिन्यात साखरेचे किती टक्क्यांनी वाढलेत, साखरेवर १०० टक्के आयात शुल्क लागू असताना भारतावर दशकभरात पहिल्यांदाच कच्ची साखर आयात करण्याची वेळ का आली आणि साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं आता कोणते निर्बंध लादलेत, त्याचा सर्वसामान्यांना काही फायदा होणार आहे का, सर्वात महत्त्वाचे साखरेचे भाव आता कडाडलेले असताना भविष्यात शेतकऱ्यांना याचा काही फायदा होणार का हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#SugarPriceHike #SugarPrice #SugarRateHike #SugarPriceIndia #SugarPrice2026 #SugarNews #SugarMarket #EthanolProduction #EthanolBlending #SugarcaneFarmers #SugarcanePrice #SugarIndustry #RawSugarImport #SugarImportIndia #SugarSupply #SugarDemand #SugarPriceRise #SugarNewsIndia #SugarFarmers #MaharashtraSugar #SugarcaneNews #SugarMarketIndia #SugarPriceUpdate #SugarPriceHike #SugarImport #GlobalSugarPrice #SugarStockLimit #Sugar #SugarPrice #SugarPricesNews #Market #SugarPrices #Consumers #India #Ethanol #MarathiNewsSugar prices have surged from ₹62–65 to nearly ₹80 per kg. The Centre has allowed duty-free imports of 1 million tonnes of raw sugar to control prices. But why are prices rising? Ethanol production, lower sugar availability and supply concerns are key reasons. In this video, we explain the price surge, government measures, impact on consumers and whether farmers will benefit.