रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्गची श्रमदान मोहिम
आचरा प्रतिनिधी : दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाने रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबवली होती. या मोहिमेत गडाच्या मुख्य दरवाज्याच्या देवडीजवळील भागातील अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक काढण्यात आला. या कामादरम्यान कित्येक वर्षे पूर्णपणे मातीत गाडली गेलेली एक ऐतिहासिक पायरी पुन्हा प्रकाशात आली. हा क्षण प्रत्येक दुर्गवीरासाठी अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा होता. गडावर जाणाऱ्या अनेक वर्षांपासून…
