Pavel Durov in Russia WANTED List: मेसेजिंग ॲप टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोववर रशियाने दहशतवादाला समर्थन देण्याचे आरोप केले आहेत. यासह 41 वर्षीय दुरोव यांना आंतरराष्ट्रीय ‘वॉन्टेड’ यादीत टाकले आहे. दुरोवचा जन्म आणि कारकिर्दीची सुरुवात रशियातच झाली, पण नंतर परदेशात स्थायिक झाले. रशियन अधिकारी देशातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप्सपैकी टेलिग्रामवर निर्बंध लादत असतानाच आरोप लादले गेले.

टेलिग्राम सीईओ ‘वॉन्टेड’
युक्रेनियन विशेष संस्था आणि दहशतवादी व अतिरेकी संघटनांकडून रशियामध्ये घातपात, दहशतवादी हल्ले, सामूहिक हत्या आणि सायबर फसवणूक यांसारख्या कारवायांचे नियोजन आणि समन्वय साधण्यासाठी कथितपणे वापरले जाणारे कंटेन्ट टेलिग्रामने हटवली नाही या वस्तुस्थितीशी संबंधित दुरोवविरुद्ध आरोप असल्याचे FSB ने सांगितले.
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना भरगच्च पगारवाढ, ‘हा’ फॉर्म्युला ठरला तर मिळेल 20 लाखांची बेसिक सॅलरी; पाहा कॅलक्युलेशन
रशियन अधिकारी देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी टेलिग्रामवरील निर्बंध अधिक कडक करत असताना कंपनीच्या सीईओंविरुद्ध आरोप समोर आले आहेत. अशा परिस्थितीत, आरोप सिद्ध झाल्यास दुरोव यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.इंटरनेटवरील सरकारी नियंत्रण वाढवण्याच्या क्रेमलिनच्या व्यापक मोहिमेचा भाग म्हणून पावले उचलली आहेत, जी फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या मोठ्या आक्रमणापासून अधिक तीव्र झाली.
पावेल दुरोवची संपत्ती किती
41 वर्षीय पावेल दुरोवचा जन्म रशियात झाला आणि तिथंच लहानाचे मोठे झाले व कारकिर्दीची सुरुवात केली, तर सध्या दुरोव संयुक्त अरब अमिराती आणि फ्रान्सचे नागरिक आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, पावेल दुरोवची एकूण संपत्ती 6.6 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 63000 कोटी रुपये आहे.
Millionaire Post: अमेरिकेत 100 कोटी रुपये कमवणारा भारतातल्या एका छोट्याशा गावात का राहतोय? उद्योगपतीची मनाला भावणारी पोस्ट
पावेल दुरोवने 2013 मध्ये टेलिग्राम ॲप सुरू केलेले, जे आता जगभर 1 अब्जाहून अधिक वापरकर्त्यांसह जगातील सर्वात मोठ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी बनले आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान माहितीच्या देवाणघेवाणीत या प्लॅटफॉर्मने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि दोन्ही देशांतील लोकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला.
टेलिग्रामचे प्रशासन ‘असंख्य चॅनेल्स, चॅट्स आणि बॉट्स’ हटवण्यात अयशस्वी ठरले, ज्यांचा वापर युक्रेनियन गुप्तचर संस्था आणि दहशतवादी व अतिरेकी संघटनांकडून रशियामध्ये घातपात, दहशतवाद, सामूहिक हत्या आणि सायबर फसवणुकीच्या कृत्यांची तयारी करण्यासाठी व ती पार पाडण्यासाठी केला जात असल्याचा ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेनुसार रशियाची मुख्य देशांतर्गत एजन्सी FSB ने आरोप केला.
दुरोवने याआधी VKontakte नावाचे रशियन फेसबुकसारखे प्लॅटफॉर्म सुरू केले होते, ज्याला वापरकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यादरम्यान, रशियन अधिकाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे दुरोवने 2014 मध्ये या सोशल नेटवर्किंग कंपनीमधील उर्वरित हिस्सा विकला. रशिया-युक्रेन युद्धाच्या दोन्ही बाजूंसाठी टेलिग्राम एक प्रमुख संवाद माध्यम बनले, ज्यामुळे सध्याच्या संघर्षात अत्यंत महत्त्वाचे ठरले.
ITR Filing Deadline : उरले शेवटचे 2 दिवस! घाईघाईत सबमिट बटण दाबण्यापूर्वी नक्की तपासा या 4 गोष्टी, अन्यथा राखडेल रिटर्न
पण टेलिग्राम संदर्भात दुरोवला समोरे जावे लागणारे पहिले मोठे कायदेशीर आव्हान नाही. 2024 मध्ये फ्रेंच अधिकाऱ्यांनी पॅरिसमध्ये दुरोवला अटक केलेले आणि टेलिग्रामच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया (जसे की अमली पदार्थांची तस्करी आणि बाल लैंगिक शोषणाच्या साहित्याचे वितरण) सहभागी असल्याचा आरोप केला होता.
शुक्राणूंद्वारे बनले 100 मुलांचे बापमाणूस
वृत्तसंस्था AP मधील माहितीपर लेखानुसार, पावेल दुरोव यांना 3 माजी गर्लफ्रेंडपासून सहा मुले आहेत. तसेच याआधी शुक्रणू (स्पर्म) दानातून आपण 12 देशांमध्ये 100 अधिक मुलांचा बाप असल्याचे जाहीर केलेले. तसेच दुरोवने सर्व मुलांना समान संपत्ती देण्याचेही जाहीर केलेले. एका फ्रेंच मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दुरोवने सांगितले की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी आपापसात भांडू नये अशी इच्छा व्यक्त केलेली.

