Headlines

'डबल द बस':संभाजीनगरच्या सक्षम सिटीबस सेवेसाठी नागरिकांच्या मतांचा कौल; ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचाचे विशेष अभियान




झपाट्याने विस्तारणाऱ्या आपल्या शहरात आज वाहतूक कोंडी, महागडा प्रवास आणि वाढते प्रदूषण या मोठ्या समस्या बनल्या आहेत. या सर्व समस्यांवर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे ‘सक्षम आणि सर्वसमावेशक शहर बस सेवा’. केंद्र सरकारच्या नियमानुसार शहरासाठी किमान 600 बसेसची गरज असताना, आज प्रत्यक्षात केवळ 100 बसेस उपलब्ध आहेत, ज्यातील अवघ्या 70 ते 80 बसेस रस्त्यावर धावतात. ही बिकट परिस्थिती बदलण्यासाठी आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ या विविध सामाजिक संस्थांच्या मंचाने पुढाकार घेतला आहे. मनपा आणि नगरविकास विभागाकडे 14 प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक विशेष ऑनलाईन सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण फॉर्ममध्ये काय आहे? फॉर्म भरण्यासाठी फक्त 2 मिनिटांचा वेळ लागतो. यात पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मत नोंदवता येईल: अभियानाचा उद्देश आणि पुढील पाऊल या सर्व्हेक्षणातून मिळणारा डेटा आणि अहवाल थेट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला सादर केला जाणार आहे. शहरात लवकरच नवीन एसी इलेक्ट्रिक बसेस दाखल होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, या सर्व्हेमुळे प्रशासनाला योग्य ते निर्णय घेणे सोपे जाईल. “शहराची बस सेवा सुधारण्याच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी जास्तीत जास्त शहरवासीयांनी क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन फॉर्म भरावा.”— रूपेश कलंत्री (समन्वयक, आम्ही पर्यावरण प्रेमी) सहभाग कसा नोंदवाल? या उपक्रमात सहभागी प्रमुख संस्था औदुंबर फाऊंडेशन (कला कट्टा), अर्बन रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इस्ट, इको ग्रीन, बेस्ट फाऊंडेशन, क्रेझी फ्रेंड्स ग्रुप, दीपशिखा फाऊंडेशन, ग्रीन बार्टर, प्लॉगर्स ग्रुप, जनसहयोग प्रतिष्ठान, गरवारे कम्युनिटी सेंटर, रीड ॲंड लीड फाऊंडेशन, अम्ब्रेला फाऊंडेशन, संडे क्लब, आणि जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत