गुरुकुंज मोझरी बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव:पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहांना कुलूप; अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला हरताळ फासत गुरुकुंज मोझरी बसस्थानकाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. हे बसस्थानक अनेक समस्यांचे माहेरघर बनले असून, प्रवाशांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या बसस्थानकातून शिरजगाव, शिवणगाव, अनकवाडी, तळेगाव, वऱ्हा, कुऱ्हा यांसारख्या अनेक गावांतील शेकडो प्रवासी आणि महाविद्यालयीन…
