Headlines

Aadesh Bandekar : होम मिनिस्टरचे किस्से अन् कलाक्षेत्रातला प्रवास; आदेश भावोजींची हृदयस्पर्शी मुलाखत – actor and anchor aadesh bandekar mata katta interview


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

२००४ मध्ये ‘दार उघड बये दार उघड’ या प्रोमोसोबत ‘होम मिनिस्टर’चा प्रवास केवळ १३ भागांसाठी सुरू झाला होता. पण महाराष्ट्राच्या घराघरांतून मिळालेल्या प्रेमामुळे तो तब्बल २० वर्ष अखंड सुरू राहिला. या वीस वर्षांच्या आनंदयात्रेनंतर ३१ ऑगस्ट २०२४ रोजी या प्रवासाला काही काळासाठी विराम दिला. होम मिनिस्टर या शो मधून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात राहणाऱ्या वेगवेगळ्या रसिका प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलेले भावोजी म्हणजे अभिनेते, सूत्रसंचालक आदेश बांदेकर पुन्हा एकदा होम मिनिस्टरचं नवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे महिला प्रेक्षकवर्ग आनंदी आहे. या मालिकेचा प्रोमो समोर आल्यापासून तो झपाट्याने व्हायरल झाला. होम मिनिस्टर मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याबाबत आदेश बांदेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सला विशेष मुलाखत दिली. यावेळी आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टरचे किस्से, कलाक्षेत्रातला त्यांचा प्रवास याबद्दल मनमोकळा संवाद साधला. पाहा संपूर्ण मुलाखत…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत