नोकरी सोडल्यानंतर त्यांनी विविध व्यवसायासंबंधित रिसर्च करण्यास सुरुवात केली. त्यांनी शॉर्ट टर्म रेंटल व्यवसाय कसा चालतो? या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासंबंधित अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्यांच्या मालमत्तेला Airbnb वर सूचीबद्ध केले. या व्यवसायाचा पाया त्यांनी दिल्लीत उभारला.
विशेष म्हणजे अगदी पहिल्याच दिवशी त्यांना बुकिंग मिळाली. अगदी पहिल्याच दिवशी वाटेला थोडे यश येणे त्यांच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरले. स्निग्धा यांनी शॉर्ट टर्म रेंटल व्यवसायातून 3 वर्षांत सुमारे 21 लाखांचा महसूल उभा केला.
शॉर्ट टर्म रेंटल व्यवसाय म्हणजे काय?
शॉर्ट टर्म रेंटल व्यवसायात घर किंवा एखादी मालमत्ता वर्षांसाठी भाड्याने देण्याऐवजी दिवसांसाठी किंवा आठवड्यासाठी भाड्याने दिली जाते. ग्राहकाच्या गरजेनुसार ग्राहकाला सेवा पुरवण्यात येते. तसेच दिवसाच्या रेटप्रमाणे भाडे आकारण्यात येते. जर तुमच्याकडे अशी मालमत्ता आहे जी वापरात नाहीये, त्यापासून तुम्ही हा व्यवसाय उभारू शकता. तुमची मालमत्ता Airbnb वर सूचीबद्ध करून ग्राहक मिळवता येते.
या व्यवसायात तुम्ही मालकासह जागेचे ऑपरेटरही असता त्यामुळे बुकिंग सांभाळणे, जागेची वेळोवेळी साफसफाई करणे, मालमत्तेची देखभाल करणे तसेच काही बिघाड झाल्यास त्वरित दुरुस्ती करणे आणि ग्राहकांकडून चांगले Reviews मिळवणे या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते. एक लक्षात ठेवा ‘चांगले Reviews म्हणजे जास्त ग्राहक आकर्षित होतील.’ तुमच्या मालमत्तेत राहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांशी वेळोवेळी संपर्क ठेवावा लागतो, त्यांच्या सोयीसुविधांविषयी खबरदारी घ्यावी लागते. तसेच चेक इन-चेक आऊटचे व्यवस्थापन करावे लागते.
डॉलर घसरला, भारतीय चलनाला बळकटी, शेअर मार्केटही सुसाट; आता पुढे काय?या व्यवसायात विविध खर्चही असतात. जर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी एखादी जागा भाड्यावर घेतली असेल तर त्या मालमत्तेचे भाडे, वीज, फर्निचर तसेच Airbnb ला प्रत्येक बुकिंगवर द्यावी लागणारे शुल्क आणि कमावलेल्या नफ्यावर आयकर विभागाला द्यावे लागणारे कर या सगळ्या गोष्टींमागे होणारा एकूण खर्च लक्षात घ्यावा लागतो. जर मालमत्ता स्वतःची असेल तर उत्तम. पण नसेल तर व्यवसायासाठी मालमत्ता वापरण्याआधी जागेच्या मालकाची परवानगी घ्यावी लागते. त्या ठिकाणचे सोसायटी रूल्स तसेच इतर स्थानिक नियम लक्षात घ्यावे लागतात. मुळात, या व्यवसायाचा फायदा असा की यातून व्यावसायिकाला Flexibility मिळते. व्यक्तीला त्याच्या वेळेवर अधिक नियंत्रण ठेवता येते.

