‘पंढरीची वारी’ चित्रपटाचा मुहूर्त, शूटिंगची तयारीही झाली, अन् अरुण सरनाईक यांच्या अपघाती निधनाचा फोन, डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग
मराठी सण उत्सव आणि सिनेमे…यांचं एक वेगळंच समिकरणच आहे. प्रत्येक सणाच्या दिवशी एखादा ठराविक सिनेमा टीव्हीवर हमखास लागतोच, अन् प्रेक्षकही तो सिनेमा आवडीनं पाहतात. असाच एक सिनेमा म्हणजे पंढरीची वारी. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत, जे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता प्रेक्षकांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनतात. दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा…
