आजारी असतानाही मौन आंदोलन, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा – anna hazare silent protest supporting student against neet paper leak
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 2:30 pm Follow देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला नीट परीक्षेचा मुद्दा सध्या पेटलाय. दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलनाची धग पाहायला मिळतेय. पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधूर, विरोधकांची निदर्शने अन् विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष… या सगळ्यात आता देशातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा उडी घेतलीय. अण्णा हजारेंनी आता थेट ‘मौन आंदोलनाचं’ हत्यार उपसलंय. अहिल्यानगरमध्ये एक…
