Headlines

Nashik Youth Murder Case; Video Shooting Controversy Leads to Arrests


मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून, त्याला दुमजली इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 18) पहाटे विल्होळी येथे उघडकीस आला. राहुल संजय सरकटे (वय 30, रा. संघर्षनगर, विल्होळी)

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम गाडेकर याने एका महिलेसोबत दीपकचे मोबाईलमध्ये शूटिंग केले होते. त्याचा राग दीपकच्या मनात होता. त्यामुळे दीपकने त्याचा मित्र अजय गांगुर्डे आणि वैभव मेंगाळ यांना विल्होळी येथे बोलावून घेतले. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संशयितांनी मच्छी मार्केट परिसरात रमेश खरे आणि राहुल सरकटे यांची पिकअप अडवली. त्यानंतर दोघांना पकडून शांताराम गाडेकर याच्या घराकडे नेण्यात आले.

राहुलचा जागीच मृत्यू

तेथे संशयितांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. प्राण वाचवण्यासाठी गाडेकर, खरे आणि राहुल हे तिघेही जिन्याने दुमजली गच्चीवर गेले; मात्र संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. गच्चीवर अजय गांगुर्डे याने राहुलच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या राहुलला वैभव मेंगाळ याने गच्चीवरून खाली फेकून दिले. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने राहुलचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून तिघांना अटक

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत अजय रामदास गांगुर्डे (रा. तळेगाव), वैभव गोविंद मेंगाळ (रा. दत्तनगर, अंबड) आणि दीपक एकनाथ पारधी (रा. विल्होळी) या तिघा संशयितांना अटक केली आहे.

हे ही वृत्त वाचा जुन्नर हादरले:पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वाचा सविस्तर



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत