बॉलिवूडमध्ये कलाकारांना अनेकदा विशिष्ट प्रतिमेत बसवण्याचा प्रयत्न होतो. अभिनेत्रींच्या लूक, कपडे केसांची स्टाइल आणि सार्वजनिक वागण्यावर कायम लक्ष ठेवलं जातं. इंडस्ट्रीतल्या तथाकथित ‘ब्युटी स्टँडर्ड्स’ आणि स्टीरिओटाइप्सवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. अभिनेत्री सैयामी खेर हिनंही नुकतंच एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीला अशाच अनुभवांना सामोरं जावं लागल्याचं सांगितलं. इंडस्ट्रीत टिकायचं असेल, तर तिनं लूक बदलावा, विशिष्ट पद्धतीनं कपडे घालावेत आणि कुरळे केस सरळ करावेत, असे सल्ले तिला वारंवार दिले जात होते. मात्र, तिनं या साच्यात बसण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला.
नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत सैयामी खेरनं बॉलिवूडमधील लूक आणि सौंदर्याच्या ठरवून दिलेल्या निकषांवर सडेतोड भाष्य केलं. ती म्हणाली की, जेव्हा मी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, तेव्हा मला अनेक मॅनेजर्स आणि लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला की, अभिनेत्रींनी एका विशिष्ट पद्धतीनंच दिसलं पाहिजे. जर तुला इंडस्ट्रीत जास्त काळ टिकायचं असेल, तर कपडे घालण्याची शैली बदल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझे कुरळे केस सोडून दे. अनेक लोक तुम्हाला एका साच्यात फिट करण्याचा प्रयत्न करतात. पण तुमची मूळ ओळख हीच तुमची खरी ताकद असते आणि तीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं.
Tukaram Mundhe: फार काही ग्रेट, वेगळं करतायत असं नाहीये; तुकाराम मुंढेंबद्दलच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचं उत्तर, सोशल मीडियावर चर्चा सैयामी म्हणाली, ‘अभिनेत्रीनं कसं दिसावं, कसं बोलावं, काय परिधान करावं, याबाबत अनेकांच्या ठाम कल्पना असतात. पण मी खेळांवरील प्रेम, राजकारण आणि क्रीडा विषयांवरील मतं व्यक्त करणं कधीच थांबवलं नाही. मला फॅक्टरीत तयार केलेली बार्बी व्हायचं नव्हतं.’ सैयामीच्या मते, वेगळेपण हेच कलाकाराचं खरं बळ असतं. ठरावीक लूक न स्वीकारताही तिला चांगलं काम मिळत राहिलं, याचा तिला आनंद आहे. तिच्या या भूमिकेचं सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. ती लवकरच प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ चित्रपटात दिसणार आहे.
सैयामी लवकरच प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय, तिची प्रमुख भूमिका असलेला ‘पल भर के लिए’ हा चित्रपटही चर्चेत आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा