![]()
काही व्यक्तिमत्त्वे इतिहासाच्या एकाच अध्यायापुरतीमर्यादित नसतात. ती प्रत्येक पिढीसमोर एक नैतिक प्रश्नम्हणून उभी राहतात. महात्मा गांधी आणि चंद्रशेखर हीअशीच व्यक्तिमत्त्वे आहेत. या दोघांचे एकत्र स्मरणकरणे म्हणजे लोकशाहीच्या दोन परंपरांना उजाळा देणेहोय. त्यांनी सत्तेपेक्षा समाजावर जास्त विश्वास ठेवला. या दोघांच्याही आयुष्यात प्रवासाला विशेष महत्त्व होते.गांधीजींनी भारत देश पायी, रेल्वेने आणि बैलगाडीनेसमजून घेतला. तर चंद्रशेखर यांनी सत्तेच्या वर्तुळातूनबाहेर पडून समाजाची स्पंदने जाणण्यासाठी भारत-यात्राकेली. भारताचा आत्मा गावातील धुळीत, शहरांमधीलअस्वस्थतेत व सामान्य माणसाच्या आकांक्षांमध्येवसलेला आहे, हे ते दोघेही जाणून होते. त्यांच्यासाठीप्रवास हा समाजाचा एक अभ्यासच होता. आजचा भारतअभूतपूर्व तांत्रिक बदलांच्या काळातून जात आहे. अंतरेकमी झाली. माहितीचा स्फोट झाला. एआय आपल्यानिर्णयांवर प्रभाव पाडत आहे. तंत्रज्ञानाने वेग नक्कीचवाढवला . पण त्याने माणसातील संवेदना अधिक खोलकेली आहे का? हा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरात गांधीजी वचंद्रशेखर मार्गदर्शक म्हणून आपल्यासमोर येतात. लोकशाहीला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित केले जाते.तेव्हा तिची खरी शोकांतिका सुरू होते. निवडणुका हालोकशाहीचा उत्सव नक्कीच आहेत, पण तो तिचा मूळगाभा नाही. नागरिक फक्त मतदार आणि राजकारण हेकेवळ ‘इलेक्शन मॅनेजमेंट” बनते, तेव्हा लोकशाहीचाआत्मा क्षीण होऊ लागतो. महात्मा गांधींसाठी लोकशाहीम्हणजे केवळ बहुमताचे राज्य नव्हते. शेवटच्या रांगेतउभ्या असलेल्या माणसाचा सन्मान हीच त्यांच्यासाठीलोकशाहीची खरी कसोटी होती. गांधीजी म्हणायचे की,कायदा माणसाला शिक्षा देऊ शकतो. पण त्याला नैतिकबनवू शकत नाही. करुणा ही कोणत्याही कायद्यातूननिर्माण होत नाही. सहअस्तित्व हे कोर्टाच्या कोणत्याहीआदेशाने स्थापन करता येत नाही. म्हणूनच लोकशाही हीशेवटी माणसाच्या मनात जन्म घेते. यामुळेच सार्वजनिकजीवनात भाषा व वर्तनाला केवळ राजकीय नाही, तरनैतिक महत्त्वही असते. गांधीजी विरोधकांसाठीहीसन्मानजनक भाषा वापरत असत. चंद्रशेखर संसदेत तीव्रटीका करायचे, पण त्याचे रुपांतर कधीही वैमनस्यात होऊदिले नाही. मतभेद ही लोकशाहीची ताकद आहे. अनेकभाषा, श्रद्धा, संस्कृती आणि जीवनपद्धती मिळूनभारतीयत्व तयार होते. गांधीजींनी याला भारताचीआध्यात्मिक ताकद मानले तर चंद्रशेखर यांनी सामाजिकन्याय आणि राष्ट्रीय एकता यांना एकमेकांचे पूरक मानले.आज ओळखीचे राजकारण संवादाच्या राजकारणावरवरचढ होताना दिसते, तेव्हा भारताचा आत्माएकसारखेपणात नसून सहअस्तित्वात वसलेला आहे.एआयच्या या युगात सर्वात महत्त्वाचा प्रश्न यंत्र कितीविचार करू शकते हा नव्हे तर माणूस अजूनही भावनाअनुभवू शकतो का? हा आहे. गांधीजी यंत्रांच्या विरोधातनव्हते; तर ते माणसाच्या विस्थापनाचे विरोधी होते.चंद्रशेखरसुद्धा विकासाच्या विरोधात नव्हते; माणूस मागेपडेल अशा विकासाच्या विरोधात होते. अल्गोरिदमनेमाणसाच्या विवेकाची जागा घेतली आणि यंत्रे आपलीस्मृती बनल्या, तर लोकशाही तांत्रिकदृष्ट्या आधुनिकहोईल, पण नैतिकदृष्ट्या गरीब बनेल. लोकशाहीचे भविष्यकेवळ संसदेत नाही तर शाळा, महाविद्यालये, कुटुंबे वनागरिक जीवनातील छोट्या-छोट्या प्रक्रियांमधून घडेल.नवी पिढी जर या विविधतेचा आदर करेल, प्रश्नविचारण्याचे धैर्य दाखवेल आणि भीतीमुक्त विवेकविकसित करेल, तरच ही लोकशाही जिवंत राहील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
Source link
प्रो. मनोज कुमार झा यांचा कॉलम:अल्गोरिदमने विवेकाची जागा घेतली तर माणूस मागे पडू शकतो
