Headlines

EPF Withdrawal for Medical Emergency Rule; नोकरी सुरू होऊन फक्त 1 महिना झाला, तरी Medical Emergency मध्ये PF विड्रॉ करता येतो; अनेकांना माहिती नाही नियम


EPFO News: ईपीएफ खात्यातील कर्मचाऱ्यांची भविष्यासाठी केलेली बचत आता केवळ सेवानिवृत्तीनंतरच नव्हे, तर गरजेच्या वेळीही वापरता येईल. EPFO एक अशी संस्था आहे, ज्याद्वारे कर्मचारी नोकरीनंतर रिटायर्ड जीवनासाठी पैसे जमा करतात. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या याआधीच्या नियमांनुसार, EPF खात्यातील शिल्लक रक्कम केवळ सेवानिवृत्तीनंतर किंवा नोकरी गमावल्यानंतरच वापरता येत होती. पण, आता या नियमांमध्ये काही बदल केले गेले आहे.

EPF विड्रॉलचे नवीन नियम

ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार कर्मचारी आता गरजेनुसार EPF खात्यातील एकूण शिल्लकपैकी वैद्यकीय गरजा, शिक्षण, विवाह, घरगुती खर्च आणि बेरोजगारी या परिस्थितीत 75% पर्यंत रक्कम काढू शकतील. मात्र, समजा तुम्ही नव्या नोकरीत रुजू होऊन फक्त एकच महिना झाला असेल आणि घरी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढू शकता का?

Maharashtra Timesपालकांच्या अडचणीतून तयार झाली व्यवसायाची संधी! आईच्या काळजीने उभा राहिला हजारो कोटींचा व्यवसाय, कोण आहेत रितू नारायण?होय, नवीन ईपीएफओ नियमांनुसार, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती एक अशी श्रेणी आहे, ज्यामध्ये तुम्हाला विड्रॉलसाठी किमान सेवा कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत EPF विड्रॉलचा नियम

ईपीएफओने पैसे काढण्याच्या जुन्या 13 वेगवेगळ्या श्रेणी कमी करून केवळ 3 प्रमुख श्रेणींमध्ये विभागले आहे, ज्यामध्ये उपचार, शिक्षण आणि लग्न यांचा समावेश केला आहे. यानुसार:

अत्यावश्यक गरजा: वैद्यकीय उपचार, शिक्षण आणि लग्न

गृहविषयक गरजा: घर खरेदी करणे, बांधकाम करणे, नूतनीकरण करणे किंवा गृहकर्ज यासंबंधीच्या गरजा

विशेष परिस्थिती: स्पष्टीकरण न देता शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत पैसे काढणे

बहुतेक प्रकरणांमध्ये 7 वर्षे असलेली किमान सदस्यत्वाची अट आता फक्त 12 महिन्यांपर्यंत कमी केली गेली आहे.

Maharashtra Timesमित्तल यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाला पूर्णविराम! Airtel Payments बँकेच्या चेअरमन पदावर नवी नियुक्ती, कोण आहेत डॉ. शबनम सिन्हा?

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी सूट का?

ईपीएफओच्या वैद्यकीय उपचारांशी संबंधित नियमांनुसार, तुम्ही नुकतंच नव्या ठिकाणी नोकरीला रुजू झाले असाल तरीही, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या पीएफमधून पैसे काढू शकता. इतकेच नाही तर, गरज पडल्यास वारंवार दावाही करता येतो. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वयावर अवलंबून नसते, आणि निधीची कमतरता उपचारांमध्ये अडथळा ठरू नये, याची खात्री करण्याच्या उद्देशाने ईपीएफओने नियमांत सूट दिली आहे.

वैद्यकीय परिस्थितीत EPF मधून किती शिल्लक काढता येते?

नवीन नियमांनुसार, ‘एलिजिबल मेंबर बॅलन्स’ म्हणजे तुमच्या एकूण पीएफ निधीच्या 75% रक्कम, ज्यामध्ये तुमचे योगदान, कंपनीचे योगदान आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा समावेश असतो तर, उर्वरित 25% रक्कम रिटायरमेंटसाठी राखीव ठेवली जाते.

Maharashtra Times8th Pay Commission Pension Hike: तीन ते चार पट पेन्शन वाढीचा प्रस्ताव: ज्यांना 50 हजार अपेक्षित, त्यांना 1.91 लाख मिळू शकतो; पगारनिहाय पाहा पेन्शनचं गणितफॉर्म-31 काय आहे?

पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे सदस्य लॉगिन करून ईपीएफओचा फॉर्म-31 भरावा लागतो. लक्षात घ्या की युनिफाइड पोर्टलमुळे EPF फॉर्म 31 द्वारे विड्रॉलसाठी अर्ज करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले असले तरीही, अनेक लोक छोट्या चुका करतात ज्यामुळे दावे निकाली काढण्यात विलंब होतो. वरील परिस्थितीत पीएफ खात्यातून किती रक्कम काढली जाऊ शकते आणि फॉर्म-31 कसा भरायचा सविस्तर जाणून घेऊ.

1. unifiedportal-mem.epfindia.gov.in वर लॉगिन करा.

2. ऑनलाइन सेवा → दावे (फॉर्म 31, 19, 10C) येथे जा.

3. तुमची केवायसी माहिती तपासा, त्यानंतर आधार, पॅन आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करून घ्या.

4. ड्रॉपडाउनमधून पीएफ ॲडव्हान्स (फॉर्म 31) निवडा.

5. पैसे काढण्याचे कारण, पत्ता आणि रक्कम नमूद करा.

6. गरज असल्यास आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

7. तुमचा अर्ज किंवा रिक्वेस्ट सबमिट करा आणि तुमच्या दाव्याच्या स्थितीचा मागोवा घ्या.

8. 5 ते 15 कामकाजाच्या दिवसांत मंजूर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.