Headlines

नोकियाचा नवा धमाका! ‘Nokia 123 Shield’ फोन लॉन्च; एकदा चार्ज केला की 19 दिवस चालणार बॅटरी। Maharashtra Times


HMD कंपनीने ग्राहकांसाठी आपला नवीन आणि अत्यंत मजबूत फीचर फोन ‘Nokia 123 Shield’ अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहणाऱ्या (Water and Dust Resistant) खास डिझाइनसह येतो. या फोनचे सर्वात मोठे फीचर्ससह म्हणजे याची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 19 दिवसांपर्यंत टिकू शकते. चला तर मग जाणून घेऊया.

Nokia 123 Shield Feature। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
नोकिया ब्रँडच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. HMD ने बाजारात ‘ Nokia 123 Shield ‘ हा रफ-अँड-टफ फीचर फोन सादर केला आहे. प्रतिकूल हवामानातही टिकून राहण्यासाठी या फोनला सुरक्षित डिझाइन देण्यात आले आहे. मजबूत बॉडी आणि तब्बल 19 दिवसांच्या बॅटरी बॅकअपमुळे हा फोन दुर्गम भागात वापरण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.

HMD ने पुन्हा एकदा एक नवीन फोन लाँच केला आहे, ज्याने आपल्या फीचर फोन पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कंपनीने हे डिव्हाइस नोकिया 123 शील्ड या नावाने सादर केले आहे. कंपनी या फोनला आपला सर्वात परवडणारा फीचर फोन म्हणत आहे, जो खास बाहेर काम करणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे किंवा स्वस्त बॅकअप फोन हवा आहे.

या फोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे त्याचे वॉटर आणि डस्ट रेझिस्टंट डिझाइन. जरी कंपनीने अद्याप या फोनची अधिकृत जागतिक किंमत जाहीर केलेली नाही, परंतु बल्गेरिया आणि ग्रीसच्या रिटेल लिस्टिंगनुसार, याची किंमत 35 ते 40 युरो दरम्यान म्हणजेच सुमारे 3,500 रुपये- 4,000 रुपये दरम्यान असू शकते.

नोकिया 123 शील्ड स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, या नवीन नोकिया 123 शील्डमध्ये 2.4 इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले मिळत आहे. फोनचा बाह्य भाग टेक्सचर्ड प्लास्टिक फिनिशने बनलेला आहे, ज्यामुळे ते पकडणे खूप सोपे होते. तर तळाशी असलेले पोर्ट्स रबरच्या फ्लॅपने झाकलेले असतात, जेणेकरून पाणी, धूळ आणि वाळू फोनच्या आत जाऊ शकत नाही. या फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

हे डिव्हाइस S30+ ऑपरेटिंग सिस्टमसह सुसज्ज आहे आणि 4MB रॅम आणि4MB अंतर्गत स्टोरेजसह जोडलेल्या Unisoc SC6531E प्रोसेसरद्वारे सपोर्ट आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी या फोनमध्ये 32 GB पर्यंत मायक्रोएसडी कार्ड जोडता येवू शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्यूव्हीजीए कॅमेरा आणि मागील बाजूस एलईडी फ्लॅश देखील मिळतो.

बॅटरी आणि इतर फीचर

नोकियाच्या उत्कृष्ट फोनमध्ये 1,750mAh ची रिमूव्हेबल बॅटरी मिळत आहे, ज्याचा कंपनीचा दावा आहे की हा फोन एकाच चार्जवर 27.9 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 19 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देऊ शकतो. फोनमध्ये वायरलेस आणि वायर्ड दोन्ही मार्गांनी काम करणारा एफएम रेडिओ सपोर्ट देखील मिळत आहे.

फोनमध्ये बिल्ट-इन फ्लॅशलाइट आणि ड्युअल मिनी सिम सपोर्ट देखील मिळतो. हा फोन केवळ 2G नेटवर्कला सपोर्ट करत असला तरी ज्या देशांमध्ये 2G सेवा बंद केल्या जात आहेत अशा देशांमध्ये त्याचा वापर मर्यादित असू शकतो. या फोनचे वजन केवळ 108 ग्रॅम आहे आणि तो हिरव्या आणि जांभळ्या रंगात सादर करण्यात आला आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा