ICC Ranking Vaibhav Sooryavanshi News : भारताचा कर्णधार शुभमन गिल वनडे फॉरमॅटध्ये जगातील नंबर वन ठरला आहे. तर टी-२० मध्ये वैभव सूर्यवंशी याने मोठा धमाका केल्याचं पाहायला मिळालं आहे. विराट-रोहित आणि बुमराह कितव्या स्थानी आहेत जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयसीसीची ताजी रँकिग जाहीर झाली असून वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये मोठे भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने पहिल्या स्थानी झेप घेतली असून तो वनडे फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वनचा फलंदाज ठरला आहे. तर दुसरीकडे भारताचा बेबी बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैभव सूर्यवंशी याने टी-२० फॉरमॅटमध्ये तब्ब्लल २३० स्थानांनी हनुमान उडी घेतलीय, वैभव आता कितव्या स्थानी पोहोचला आहे ते जाणून घ्या.
वन डे फॉरमॅटमध्ये कॅप्टन शुभमन गिल अग्रस्थानी आलाय. गिल हा ८०१ गुणांसह नंबर वन आहे. त्याने न्यूझीलंड संघाच्या डॅरेल मिचेल याला मागे टाकले असून तो ७९५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर गेला आहे. तर भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली (७६७ गुण) आणि रोहित शर्मा (७५८ गुण) हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. टॉप १० मध्ये भारताचे टॉप तीन खेळाडू असून श्रेयस अय्यर १३ व्या तर के.एल. राहुल १८ व्या स्थानावर कायम आहेत. Ryan ten Doeschate : गौतमच्या जिगरीचा करार BCCI ने थांबवला, भारताचे एक्स कोच डोशेट यांना दुसऱ्याच दिवशी मोठी ऑफर टी-२० फॉरमॅटमध्ये ईशान किशन हा वैभव सूर्यवंशी याने टी-२० फॉरमॅटमध्ये ईशान किशन हा ९१० गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून अभिषेक शर्मा हा तिसऱ्या स्थानी गेला आहे. भारताचा उपकर्णधार तिलक वर्मा याने दोन स्थानांनी प्रगती केली असून तो ७५० गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सात स्थानांनी वर आला असून तो आता ६३० गुणांसह २४ व्या स्थानी आहे. S. Srikkanth : ‘रजत पाटीदारच्या तुलनेत तो काहीच नाही’; माजी खेळाडू एस. श्रीकांत टीममधील खेळाडूचं नाव घेत स्पष्टच बोलले भारत आणि झिम्बाब्वे मालिकेमध्ये मालिकावीर ठरलेल्या वैभव सूर्यवंसशी याने रँकिंमध्ये थेट २३० धावांनी झेप घेतलीय. वैभव आता टॉप-५० मध्ये पोहोचल असून ४८ व्या स्थानी आहे. वैभव सूर्यवंशी याचे ५३६ गुण झाले आहेत. झिम्बाब्वेविरूद्ध तीन सामन्यात त्याने दोन अर्धशतके केली होतीत. याचाच त्याला फायदा झाला असून तो कमी वयात टॉप ५० मध्ये येणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, आयसीसी टी-२० रँकिंग गोलंदाजीमध्ये मध्ये वरूण चक्रवर्ती याला तीन स्थानांनी नुकसान झाले असून तो आता नवव्या स्थानी गेला आहे. वनडेमध्ये मोहम्मद सिराज २२ आणि जसप्रित बुमराह २४ व्या स्थानी असून दोघांचेही एका स्थानांनी नुकसान झाले आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा