Headlines

हायकोर्टच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपके मैदानात, विद्यार्थ्यांसह मांडला ठिय्या


छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. हायकोर्टच्या टायपिंग परीक्षेसाठी आज शेकडो विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. पण या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या विद्यार्थ्यांना अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दिला आहे. दिपके हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Abhijeet Dipke
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात हायकोर्ट टायपिंग परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातील विद्यार्थी उपस्थित होते. पण या परीक्षेत विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. काही विद्यार्थ्यांचा किबोर्ड खराब होतो, तर काहींना इतर तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर ठिय्या मांडला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनस्थळी दाखल झाले.

अभिजीत दिपके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी बातचित केली. तसेच पुन्हा परीक्षा व्हावी आणि ती ऑफलाईन व्हावी, अशा मागणीसह आंदोलकांनी ठिय्या मांडला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दिला. अभिजीत दिपके हे सुद्धा विद्यार्थ्यांसह ठिय्या मांडून बसले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

“आज इथे हायकोर्टाची परीक्षा होती. या परीक्षेसाठी खूप दुरुन मुलं-मुली आले होते. बीड, आंबेजोगाई, अमरावती येथून मुलं परीक्षेसाठी आले आहेत. मुलं परीक्षेला बसले तेव्हा त्यांना लक्षात आलं की, इथे जे कम्प्युटर आहेत ते नीट काम करत नाहीत. कुणाचं किबोर्ड काम करत नाही तर कुणाची स्क्रिन काम करत नाही. दहा मिनिटांच्या आत सगळेच विद्यार्थी लॉगआऊट झाले. याचा अर्थ सर्व्हरही चांगलं काम करत नव्हतं”,

“मी पहिल्यांदाच बघतोय की, सर्व विद्यार्थ्यांना फेल करण्यात आलं आहे. हे विद्यार्थी फेल झाले नाहीत तर सिस्टम फेल झाले, सरकार फेल झाले आहे. इतक्या दुरुन विद्यार्थी येत आहेत, या विद्यार्थ्यांना सांगत आहेत की, तुम्हाला परीक्षा देण्याची अक्कल नाही का? प्रशासनाला अक्कल नव्हती का? आधीर सर्व्हर ठिक करण्याची ह्यांना अक्कल नव्हती का?”, असे सवाल अभिजीत दिपके यांनी केले.

अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा

“सरकारला अक्कल नाही आणि इतक्या दुरुन आलेल्या गरीब घरातील विद्यार्थ्यांची अक्कल काढत आहेत. मुलांची मागणी आहे की, पुन्हा परीक्षा झाली पाहिजे. ती तातडीने झाली पाहिजे. तिचं लगेच नोटीफिकेशन आलं पाहिजे. दोन शिफ्ट बाकी आहेत. जोपर्यंत जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बाहेर येऊन पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं लिखीत आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत इथून कुणीच सरकणार नाही”, अशी भूमिका दिपके यांनी जाहीर केली.

ऑनलाईन परीक्षावरुन अभिजीत दिपकेंचा निशाणा

“जिकडे तिकडे ऑनलाईन परीक्षा घेत आहेत. पण तुमची ऑनलाईन परीक्षा घेण्याची लायकी आहे का? एक परीक्षा दाखवा, जिथे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय परीक्षा घेतली असेल. तुमची ऑनलाईन परीक्षाा घेण्याची लायकी नाही तर विद्यार्थ्यांचं भविष्य खराब कशाला करता?”, असा सवाल त्यांनी केला.

अभिजीत दिपके देखील ठिय्या आंदोलनात बसले

“या मुलांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मी याच मुलांसोबत बसून राहीन. ह्यांनी ठरवलं आहे इथे बसायचं तर ह्यांचं समर्थन करण्यासाठी मी इथे बसलो आहे”, असं अभिजीत दिपके म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा