Headlines

स्त्रीवाद हा फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही; पितृसत्ता पुरुषांनाही अनेक भावना दडपायला भाग पाडते, दंगल फेम अभिनेत्रीचे विधान चर्चेत| Maharashtra Times


Sanya Malhotra Viral Statement : बऱ्याच अभिनेत्री अनेकदा स्त्रीवादावर मनमोकळेपणाने बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सान्या मल्होत्राने स्त्रीवाद हा केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही असतो असे म्हटले.

sanya malhotra
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिनेत्री सान्या मल्होत्राने काही वर्षांपूर्वी आलेल्या आमिर खानच्या “दंगल” या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे जाऊन 10 वर्षांत सान्याने चित्रपट ओटीटी विश्वात एक प्रभावी अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या भूमिका निवडण्याची पद्धत जी कधीही बाह्य दबावांमुळे प्रभावित झाली नाही. दमदार अभिनय करणे ही एक गोष्ट आहे, पण पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या उद्योगात सान्याची ठाम भूमिका तिला प्रेरणादायी बनवते. तिच्या चित्रपटांमधून महिलांना सक्षम आणि ताकदवान स्वरूपात कश्या मांडते हे कौतुकास्पद आहे.

सान्या मल्होत्राने अलीकडेच सांगितल की “Mrs “ सारख्या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटांद्वारे महिलांना सक्षम करणे हा तिचा उद्देश आहे. एका मुलाखतीत तिने सान्या मल्होत्राने स्त्रीवादाबद्दलची तिची भूमिका स्पष्ट केली आणि तो केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही असल्याचे सांगितले.

“मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी खूप मेहनत करते आणि आज मी माझ्या स्वप्नातील आयुष्य जगत आहे. मला नेहमीच अभिनेत्री व्हायचे होत. मला मिळणाऱ्या संधींसाठी आणि पडद्यावर साकारायला मिळणाऱ्या अप्रतिम व्यक्तिरेखांसाठी मी खूप कृतज्ञ आहे. अभिनेत्री म्हणून माझ्या व्यासपीठाचा योग्य प्रकारे उपयोग करत असल्याचा मला आनंद आहे. मला फक्त महिलांना योग्य पद्धतीने साकारायचे आहे”

Maharashtra TimesKangana Ranaut On Hrithik Roshan : हृतिक रोशनची कमेंट कंगना रणौतच्या जिव्हारी लागली! राग व्यक्त-आगीत तेल ओतणं कमी कर अन् गर्लफ्रेंडला फसवू नको; काय घडलं नेमकं?
“मला अशा व्यक्तिरेखा साकारायला खूप आवडतात. मी Mrs. केली आहे. माझी सुरुवात *दंगल*पासून झाली आणि माझी जडणघडण तशीच झाली आहे. मला महिलांना सक्षम करायचे आहे. मला स्वतःलाही सक्षम बनवायचे आहे आणि आत्मविश्वासाने जगायचे आहे”

तिच्यातील स्त्रीवादी विचार कसे विकसित झाले याबद्दल बोलताना सान्या म्हणाली “मी आधी स्त्रीवादी नव्हते. खरं तर, त्याचा नेमका अर्थही मला माहीत नव्हता. मी मुंबईला आले, अधिक वाचू लागले आणि मला जाणवले की महिलांमध्ये सहानुभूतीची कमतरता आहे. लोकांना आम्ही मैत्री करावी असे वाटत नाही, आम्ही कोणत्याही गोष्टीवर नेतृत्व करावे असे वाटत नाही. त्यांना आम्ही आमच्या स्वतःच्या शक्तीबद्दल, आत्मविश्वासाबद्दल आणि आम्ही काय करू शकतो याबद्दल अनभिज्ञ राहावे असे वाटते. हळूहळू मला जाणवू लागले की पितृसत्ताक व्यवस्था माझ्या कुटुंबातील महिलांमध्ये, मैत्रिणींमध्ये अस्तित्वात आहे. सोशल मीडिया माझ्यासाठी खूप मोठा डोळे उघडणारा अनुभव ठरला. माझ्या कारकिर्दीसोबतही हा बदल घडला. लहानपणी पडद्यावर असे आदर्श माझ्यासमोर नव्हते. महिलांची सहजपणे जागा बदलली जात असे आणि अभिनेत्रींसाठी पडद्यावर फारशा अर्थपूर्ण भूमिका नव्हत्या” लिली सिंगच्या Shame-Less या पॉडकास्टमध्ये सान्या मल्होत्राने तिचे हे मत व्यक्त केले.

Maharashtra TimesKajal Aggarwal : तो परवानगीशिवाय आत आला अन् शर्ट काढून टॅटू दाखवला! असिस्टंट दिग्दर्शकाच्या कृत्यामुळे थरथरायला लागलेली काजल अग्रवाल
ती पुढे म्हणाली “स्त्रीवाद हा फक्त महिलांसाठी नाही, तो पुरुषांसाठीही आहे. जेव्हा त्यांना जाणवते की पितृसत्ताक व्यवस्था त्यांनाही त्यांच्या अनेक भावना दडपायला भाग पाडते किंवा त्यांच्यावर अनेक प्रकारचे दबाव आणते, तेव्हा त्यांना समजते की पितृसत्ताक व्यवस्थेचा परिणाम काय असतो. हे फक्त महिलांनाच समजते असे नाही.”

सान्या मल्होत्राने “Mrs” या चित्रपटाचा तिच्यावर झालेला परिणामही सांगितला. ती म्हणाली, “जेव्हा मी Mrs केला, तेव्हा मी अनेक महिलांना भेटले आणि त्यांची मुलाखत घेतली. अनेक महिलांनी माझ्याशी संपर्क साधला. त्या चित्रपटाचा मला खूप अभिमान आहे आणि इतक्या लोकांनी तो पाहिला आणि आवडला याचा मला आनंद आहे. मी महिलांना भेटते आणि त्या म्हणतात की ही त्यांचीच कहाणी आहे. हे ऐकून मला दुःखही होते आणि रागही येतो. मला माहीत आहे की माझे चित्रपट चांगल्या चर्चांना सुरुवात करतात. जरी फक्त १ टक्के बदल झाला तरी मी त्यात आनंदी आहे. आपण महिलांना आई म्हणून एका उंच स्थानावर ठेवतो, त्यांच्याकडून सतत त्यागाची अपेक्षा करतो आणि अनेकदा त्याची दखलही घेत नाही. माझ्या आईला फॅशन डिझायनर व्हायचे होते, पण तिला ते शक्य झाले नाही.”

मोठ्या पडद्यावर सशक्त महिला व्यक्तिरेखांची धुरा वाहणाऱ्या सान्या मल्होत्राने आपल्या अभिनयाची व्यापकता सिद्ध केली असून ती शेवटची बंदर मध्ये दिसली होती आणि आता ती आगामी “ सुंदर पूनम “ चित्रपटात ती पुन्हा एकदा नवखी भूमिका साकारणार आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा