Headlines

दुर्घटना:मुंबईत मॅनहोलमध्ये पडल्याने वृद्धाचा मृत्यू, उघड्या मॅनहोलप्रकरणी मुंबई मनपाच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन




मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला गुरुवारी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यातील हा पावसाचा प्रभाव आगामी ७ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान, मुंबईत गुरुवारी सकाळपर्यंत २४ तासांत ९ इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली. साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी बृहन्मुंबई महापालिकेने संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर झाली. देश व्यापला मान्सूनने गुरुवारी दिल्ली, राजस्थानात दाखल होत संपूर्ण देश व्यापला. मान्सूनची उत्तरेकडील सीमा सध्या पोरबंदर, नीमच, टोंक, भिवानी आणि भटिंडा मार्गे जात आहे. ४ जूनला केरळमध्ये आलेला मान्सून २८ दिवसांत देशाच्या ९० टक्के भागात पोहोचला आहे. पुण्यात रेड अलर्ट, मुंबई व विदर्भाला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने शुक्रवारी रायगड व पुणे घाट परिसरासाठी अत्यंत तीव्र मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाट क्षेत्र, व विदर्भातील बुलढाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मराठवाड्यासाठीही तुरळक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत