Headlines

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी घेतले पाटेकर देवाचे दर्शन


सावंतवाडी प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याचे प्रसिद्ध पाटेकर देवस्थान येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पाटेकर देवाचे दर्शन घेऊन भक्तिभावाने आशीर्वाद घेतले.

पाटेकर देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर सरन्यायाधीशांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. दर्शन घेतल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी देवस्थानच्या परिसराची व ऐतिहासिक महत्त्वाची माहिती जाणून घेतली.

या प्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले, सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी, तसेच सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी उपस्थित राहून सरन्यायाधीशांचे स्वागत केले.

या दौऱ्यादरम्यान विधी क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर आणि वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, ॲडव्होकेट शामराव सावंत, ॲडव्होकेट निंबाळकर यांच्यासह इतर अनेक वकिलांनी सरन्यायाधीशांची भेट घेतली. श्रावण सोमवारच्या निमित्ताने झालेल्या या विशेष भेटीमुळे पाटेकर देवस्थान परिसरात उत्साहाचे आणि आदराचे वातावरण पाहायला मिळाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत