Headlines

खोट्या सोन्याला खरे सांगून लाखोंना गंडा ; ग्राहकासह बँकेच्या मूल्यांकनकाराच्या विरोधात गुन्हा दाखल


Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकेच्या एन -५ येथील बजरंग चौकातील शाखेत घडली. बनावट दागिने शुध्द सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र मिळवून बँकेला दहा लाख रुपयांचा चुना लावण्यात आला.

_Gold फसवणूक
म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर : बनावट दागिने शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र मिळवून बँकेला दहा लाख रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेच्या एन-५ येथील बजरंग चौकातील शाखेत घडली. या प्रकरणात दागिने तारण ठेवून कर्ज उचलणारी महिला ग्राहक फरिन तबस्सुम नौशीन मलिक (रा. जहाँगिर कॉलनी, हर्सुल) आणि बँकेचा मूल्यांकनकार पवन सुरेश वर्मा (रा. नवजीवन कॉलनी, हडको) या दोघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९० टक्के शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणित केले.

या प्रकरणात बजरंग चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक अनिता विनोद गाडेकर (वय ४१, रा. चिकलठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फरिन तबस्सुम हिने २१ ऑगस्ट २०२५ रोजी सोनेतारण कर्जासाठी अर्ज केला. बँकेच्या नियमानुसार पॅनलवरील मूल्यांकनकार पवन वर्मा याने दागिन्यांची तपासणी करून ते ९० टक्के शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणित केले. त्यानुसार बांगड्या व ब्रेसलेटच्या तारणावर तीन लाख ४१ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.

Maharashtra TimesDhule News : आई-बापाच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावर खाकीची इच्छा, अचानक सर्व संपलं, धावताना हृदयविकाराचा झटका; सुहासने जागीच प्राण सोडले

सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यानंतर २८ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच कर्जदाराने पुन्हा नेकलेस, अंगठी, झुमकेआणि बांगड्या तारण ठेवल्या. मूल्यांकनकाराने हे दागिने ९१ ते ९२ टक्के शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेने आणखी सहा लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. अशा प्रकारे एकूण १० लाख १ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. गाडेकर यांच्या तक्रारीवरून बँकेला गंडा घालणाऱ्या फरिन तबस्सुम, बँकेचे पॅनल मूल्यांकनकार पवन वर्मा यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesNagpur News : पेर्नोड रिकार्ड इंडिया प्रकल्पाचे घोडे अडकले कुठे ? भूमिपूजनाला दोन वर्ष होत आली ; प्रकल्प रखडल्याची चर्चा

संभाजीनगरमध्ये २४ हजारांची रोख रक्कम लंपास

संभाजीनगरमध्ये फसवणुकीची अजून एक घटना समोर आली आहे. पडेगाव परिसरातील असलेल्या जमजम मेडिकल स्टोअर या दुकानातचे शटर उचकटून चोरट्यांनी २४ हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना दोन ते तीन ऑगस्टदरम्यान पडेगाव परिसरातील जमजम मेडिकल स्टोअरमध्ये घडली. या प्रकरणात मोहम्मद जावेद इलियास ठेकीया यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा