Headlines

एकविसाव्या वर्षीच 3.2 कोटी रुपये कमावले; पण त्यामुळेच 23व्या मजल्यावरुन उडी मारणार होता रॉबिन उथप्पा, नेमकं काय घडलेलं?


Robin Uthappa Post News : वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी रॉबिन उथप्पाला IPLमधून ३.२ कोटी रुपये मिळाले. पण अचानक आलेल्या या पैशांनी आयुष्यात कोणत्या अडचणी निर्माण केल्या, याचा धक्कादायक अनुभव उथप्पाने स्वतः सांगितला आहे.

Robbin uthappa
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएलने अनेक युवा क्रिकेटपटूंचे आयुष्य रातोरात बदलले आहे. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि ग्लॅमर यामुळे अनेकांचे डोळे दीपतात. पण, या अचानक आलेल्या पैशांमुळे आयुष्यात किती भयानक वादळ येऊ शकतं, याचा एक धक्कादायक आणि तितकाच डोळ्यांत अंजन घालणारा खुलासा भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा याने केला आहे.

‘अख्ख्या पिढीने पाहिला नसेल एवढा पैसा…’

रॉबिन उथप्पाने नुकतीच लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये त्याने आपल्या तरुणपणीच्या संघर्षाला उजाळा दिला आहे. २००८ मध्ये उथप्पा अवघ्या २१ वर्षांचा होता, तेव्हा त्याला आयपीएलचे ३.२ कोटी रुपयांचे पहिले कॉन्ट्रॅक्ट मिळाले. यावर तो लिहितो, “एवढा पैसा आपण वयाच्या ३०-४० व्या वर्षीही कमवू, असा मी कधी विचारही केला नव्हता. एका झटक्यात माझ्या संपूर्ण पिढीच्या कमाईपेक्षा जास्त पैसा माझ्या हाती आला होता.” पण, एका मध्यमवर्गीय कुटुंबात अचानक एवढी संपत्ती आल्यावर लाखो विचार आणि प्रचंड गोंधळ निर्माण होतो. हा पैसा कसा हाताळावा, हे सांगायला त्यावेळी आजूबाजूला कुणीही नव्हतं, अशी खंत त्याने व्यक्त केली.

Maharashtra TimesTeam India : क्रिकेट ग्राऊंडवरील तंबूत ड्रेसिंग रूम, BCCIचे अधिकारी जपानला जाणार, नेमके कशासाठी? जाणून घ्या कारण

पैशांसोबत आलेले नातेवाईक आणि नैराश्याचा अंधार

पैसा आल्यावर अनेक लोक आणि नव्या समस्याही सोबत येतात. मध्यमवर्गातून अचानक श्रीमंत झाल्यावर कुटुंबाला आणि नातेवाईकांना ‘हा पैसा माझा आहे, तुमचा नाही’ हे समजावून सांगणे सोपे नसते. याच गोंधळात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला जातो आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होते. या सगळ्याचा उथप्पाच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाला. २००९ मध्ये तो क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करत होता.

Robin Uthappa

त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतील एका हॉटेलच्या २३ व्या मजल्यावरील खिडकीच्या कट्ट्यावर बसून तो आत्महत्येचा विचार करत होता. उथप्पाच्या मते, “त्यावेळी मी कमावत असलेल्या पैशांचा माझ्यासाठी शून्य अर्थ उरला होता. पैसा तुम्हाला नैराश्यापासून वाचवू शकत नाही किंवा बिघडलेल्या कौटुंबिक समस्या सोडवू शकत नाही. पैशामुळे शांती आणि आत्मसन्मान विकत घेता येत नाही.”

Maharashtra TimesSuryakumar Yadav First Salary : सूर्यकुमारची पहिली कमाई किती होती माहितीये का? टीम इंडियात कमबॅकसाठी कसा धडपडतोय, काय म्हणाला सूर्यादादा?

रातोरात श्रीमंत होणाऱ्या तरुणांसाठी उथप्पाने महत्त्वाचे सल्ले दिले

पैसा आल्यावर तो कसा आणि कुठे गुंतवायचा यासाठी योग्य आर्थिक सल्लागारची मदत घ्या, ज्याचे आणि तुमचे हितसंबंध जुळत असतील. मानसिक शांतीसाठी अशा थेरपिस्ट किंवा कौन्सिलरची मदत घ्या, ज्याला तुमच्या पैशांशी काहीही देणंघेणं नसेल. अनुभवी लोकांच्या संपर्कात राहा. पैसा हाती येण्यापूर्वीच आपले सिद्धांत निश्चित करा. कुणाची, कशी आणि का मदत करायची आणि कुणाला स्पष्ट ‘नाही’ म्हणायचे, हे आधीच ठरवा. अचानक आलेल्या पैशामुळे आपण गोंधळलो आहोत, हे स्वीकारायला आणि मदत मागायला अजिबात संकोच करू नका. हा कोणताही चारित्र्यातील दोष नसून ती केवळ एक परिस्थिती आहे. “पैसा हा विजय नसून ती एक परीक्षाआहे. जे लोक पैसा येण्यापूर्वीच तो कसा हाताळायचा याचा पाया रचतात, तेच या परीक्षेत यशस्वी होतात,” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश उथप्पाने आपल्या अनुभवातून दिला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा