Headlines

अनाया बांगर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला भिडली, परवानगी नाकारण्याच्या मागणीला दिलं सडेतोड उत्तर, स्पष्टच बोलली…


Anaya Bangar Reply Marizanne Kapp : अनाया बांगरला क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली आहे. पण यासाठी काही नियम आणि अटी आहेत ज्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या निर्णयाला आफ्रिकेच्या महिला खेळाडूने विरोध केलाय. यावर आता अनाया उत्तर दिलं असून काय म्हणाली जाणून घ्या.

Anaya Bangar Marizanne Kapp
Anaya Bangar Marizanne Kapp(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगर चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने अनाया बांगरला महिला क्रिकेमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. या बातमीची सर्व क्रिकेट वर्तुळात चर्चा झाली. ट्रान्सजेंडर क्रिकेटरला बीसीसीआयकडून महिला क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत कोणतेही अधिकृत असे धोरण नाही. आयसीसीकडून बंदी आहे असं म्हटलं तरी चालेल पण बीसीसीआयकडून तसा कोणताही नियम नाही. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून अनायाला परवानगी असली तरीसुद्धा टेस्टोस्टेरॉनची मर्यादित पातळीचा नियम लक्षात घ्यावा लागणार आहे. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेटने अनायाला दिलेल्या परवानगीच्या मुद्द्याचा धागा पकडत दक्षिण आफ्रिकेची महिला स्टार खेळाडू मारिजान कॅप हिने हा निर्णय म्हणजे मूर्खपणा असल्याचं म्हटलं होतं. अनायाला दिलेल्या परवानगीला मारिजान कॅपने जाहीरपणे विरोध केलाय. यावर अनाया बांगरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मारिजान कॅपने इन्स्टाग्रामवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या परवानगीला मूर्खपणा असल्याचं म्हटलं असून याला परवानगी दिली नाही पाहिजे असं म्हटलं होतं. मारिजान कॅपची इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. याला अनाया बांगरने उत्तर दिलं असून या विषयाची योग्य माहिती घे, असं म्हटलं आहे. अनाया बांगर उत्तर देताना नेमकं काय म्हणाली जाणून घ्या.

Maharashtra TimesENG vs PAK Test : TVवर मुलाखत सुरू होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इंग्लंडला कसोटीवर बहिष्कार टाकण्याची धमकी; ENG-PAK दुसऱ्या कसोटीआधी मोठा ड्रामाजे लोक याच्या विरोधात आवाज उठवत आहेत त्यांनी आधी या विषयाची पूर्ण माहिती घ्यायला हवी. यामुळे कोणताही चुकीचा फायदा मिळत नाही आणि हा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच आहे, तरीही कुणाचं वैयक्तिक मत वेगळं असेल तर त्यांनी स्वतःला शिक्षित केलं पाहिजे, असं अनाया बांगर म्हणाली.

Maharashtra TimesSuryakumar Yadav : हॅलो सूर्या… टीममधून ड्रॉप करण्याआधी कोणाचा आलेला फोन, सूर्यकुमार यादवचा खुलासा, पडद्यामागे काय घडलेलं?भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी आहे. मेडिकल सर्जरी करून मुलापासून मुलगी बनलीय. अनाया बांगर आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने जरी परवानगी दिली असली तरी अनायाला काही अटी असणार आहेत. ट्रान्सजेंडर आणि जेंडर डायव्हर्स पॉलिसीनुसार १२ महिने टेस्टोस्टेरॉन पातळी १० nmol/L इतकी ठेवावी लागणार आहे. हे ब्लडद्वारे सिद्ध करणं बंधनकारक असणार आहे. मार्च २०२७ पासून एलिट क्रिकेटसाठी तिला सर्व नियम पूर्ण करावे लागतील.

Maharashtra TimesWomens Hockey World Cup : वर्ल्डकपमध्ये हॉकी महिला संघाकडून गोड शेवट, सगळ्याच खेळाडूंचा पहिलाच वर्ल्डकप, पण 52 वर्षांत पहिल्यांदाच अशी कामगिरीदरम्यान, अनाया बांगर २५ वर्षांची आहे. जन्म झाला तेव्हा मुलगा म्हणून झाला होता त्यावेळी तिचे नाव आर्यन असे होते. पण मेडिकल केल्यानंतर मुलगी झाली होती. पुढे आर्यनचे अनाया असे नाव ठेवले होते. अनायाच्या रिप्लायवर मारिजान कॅप काय उत्तर देते का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा