INDIA vs ZIMBABWE झिम्बाब्वेला पराभूत करत भारताने मालिका जिंकली, पण या विजयानंतर भारतीय संघ व्यवस्थापनेला काही प्रश्नांची उत्तरे मात्र मिळालीत. कोच लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर आले आणि भारताने टी-२० मधीस पहिल्या विजयासह मालिकाही नावावर केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये पार पडलेल्या सीरीजमध्ये यजमानांना भारताच्या शिलेदारांनी पाणी पाजलं. भारताने ही मालिका ३-०ने जिंकली. भारतीय संघाची या मालिकेसाठी घोषणा झाल्यावर संजू सॅमसन याला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे कोच गौतम गंभीरवर जोरदार टीका झाली होती. त्यावेळी भारत दुबळ्या आयर्लंड आणि इंग्लंड संघाकडून पराभूत झाला होता. हा पराभव जिव्हारी लागण्याचं कारण म्हणजे दोन्ही मालिकांंमध्ये भारताला व्हाईटवॉशचा सामना करावा लागला होता. तेव्हा वर्ल्ड कप विजेत्या संघाची खराब अवस्था झाली होती. एकही विजय मिळवता न आल्याने गौतम गंभीरवर टीका होत होती. वैभवला खेळवण्यासाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं. पुन्हा शेवटच्या सामन्यात संजू प्लेइंग ११ मध्ये तर वॉशिंग्टन सुंदर प्रदर्शन खराब असतानाही संघात कायम होता. आता भारताने झिम्बाब्वेला पराभूत करत विजयालह मालिकाही जिंकली. अनेकजण बोलत आहेत की झिम्बाब्वेला हरवून काय मिळवलं? या दौऱ्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी ज्याची उत्तरे भारतीय टीम मॅनेजमेंटला मिळाली असावीत.
वैभव सूर्यवंशी याला या मालिकेमधील तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण त्याच्यावरही दबाव होताच, वर्ल्ड कप २०२६ मध्ये मालिकावीर ठरलेल्या संजू सॅमसनच याच्या जागेवर त्याला संधी मिळाली होती. पण वैभवने मैदानात उतरल्यावर आपल्या शैलीतच फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात ५० धावा, दुसऱ्या २० धावा आणि तिसऱ्या सामन्यातस ८१ धावा त्याने केल्या होत्या. वैभव या मालिकेत सर्वाधिक १५१ धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये सामनावीर आणि मालिकावीर ठरलेल्या वैभव सूर्यवंशी याने स्वत:ला नक्कीच सिद्ध केले आहे. IND vs SL Test : श्रीलंकेविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार, दुखापतींचे ग्रहण पण वेळ ठरली, जाणून घ्या
रिंकू सिंहचे शानदार कमबॅक
टी-२० वर्ल्ड कप २०२६ नंतर रिंकू सिंहला टीममधून ड्रॉप केले होते. आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये त्याला संघात स्थान दिले गेले नाही. दोन्ही मालिका भारताने गमावल्या होत्या त्यानंतर झिम्बाब्वेंविरूद्धच्या मालिकेसाठी जाहीर झालेल्या टीममध्ये रिंकूचा समावेश करण्यात आला. यामधील तीन सामन्यांमधील दोनमध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली. दोन डावात त्याने १६८ च्या स्ट्राईक रेटने ३७ धावा केल्या त्यासोबतच उत्कृष्ट फिल्डिंगही केली. त्यामुळे पार पडलेल्या मालिकेत भारतासाठी या या तीन सकारात्मक बाजूने समोर आल्या.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा