Headlines

श्रीलंकेविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार, दुखापतींचे ग्रहण पण वेळ ठरली, जाणून घ्या


IND vs SL Test News : भारतीय संघ आता झिम्बाब्वे मालिका झाल्यावर श्रीलंक दौऱ्यासाठी जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, मात्र निवड समितीसमोर खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने संघ निवडताना गोची होण्याची शक्यता आहे. संघ कधी जाहीर होणार जाणून घ्या.

IND v SL Test Squad
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड मंगळवारी होणार आहे. मात्र त्याआधीच खेळाडूंच्या दुखापतीमुळे अध्यक्ष अजित आगरकर यांची निवड समिती चिंतेत आहे. त्यातच जायबंदी असल्याने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यातून बाद झाला आहे. या मालिकेची सुरुवात १५ ऑगस्टला गॉल कसोटीने होईल.

संघातील बऱ्याच खेळाडूंना फिटनेसशी निगडीत समस्या असल्याने पूर्णपणे फिट संघ निवडण्याचे आव्हान निवड समितीपुढे आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे. दुखापतीमुळे तो लॉर्ड्सवरील इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत खेळू शकला नव्हता.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi IND vs ZIM : वैभव तू एवढा कसा फोडतो रे? झिम्बाब्वेत पराक्रम, मालिकावीर पुरस्कार खिशात! सूर्यवंशीने आक्रमक खेळीमागचं कारण सांगून टाकलं

हर्षित आणि नितीशही बाहेरच

हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी हे दोघेही लंकेविरुद्धच्या – मालिकेसाठी उपबल्ध नसतील, असे बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) ‘सेंटर ऑफ – एक्सलन्स’ने जाहीर केले आहे. हे दोन्ही खेळाडू स्नायूंच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. ते दोघे दुखापतीतून सावरत असून पूर्वीचा फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : खायची गोष्ट नाही! वैभव सूर्यवंशीचं शतक 19 धावांनी हुकलं, तरी पठ्ठ्याने रचला वर्ल्ड रेकॉर्ड

दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन खेळणार?

‘वॉशिंग्टन श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपर्यंत फिट होऊ शकतो. मात्र निवड समिती फिटनेसच्या आधारे त्याची एकाच कसोटीसाठी निवड करते का ते बघायचे. असे झाले तर निवड समितीला फिरकी गोलंदाजीसाठी रवींद्र जाडेजा, मानव सुतार आणि कुलदीप यादव यांच्याखेरीज चौथ्या पर्याय शोधावा लागेल. अन् जर का हर्ष दुबेची निवड केली, तर तीन गोलंदाज एकाच शैलीचे होतील’, असे निवड समितीशी संबंधित एका सूत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, अशा परिस्थितीत ऑफस्पिनर सारांश जैनला संधी मिळू शकते, जो तळाला किंवा मधल्या फळीत उपयुक्त फलंदाजही ठरू शकतो.

दुखापतींचं भूत मानगुटीवर

भारतीय संघातील खेळाडूंच्या मागे दुखापतींचं भूत जणू मागे लागलं आहे. आता पार पडलेल्या भारत वि. झिम्बाब्वेमधील दुसऱ्या सामन्यात गोलंदाज प्रिन्स यालाही फक्त १२ चेंडू टाकून मैदान सोडावं लागलं होतं. त्यामुळे तिसरा सामना खेळू शकला नाही. शुभमन गिलही वनडे मालिकेट पेटके आल्यामुळे मैदान सोडून बाहेर पडला होता. गेल्या काही दिवसांपासून दुखापतींचं प्रमाणही वाढलं आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा