Headlines

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बॉक्स ऑफिसवर ‘विजय’, ‘जन नायकन’ नं पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई


Jana Nayagan Box office collection day 1: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार अभिनेते विजय यांचा ‘जन नायकन’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे.

Jana Nayagan collection
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला आणि वादात अडकलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ जन नायकन ‘ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय. सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असून पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा गल्ला जमवण्यात सिनेमाला यश आलंय.

‘जन नायकन’ सिनेमा २३ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. विजय यांच्या अभिनयातील कारकिर्दीतील हा शेवटचा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. राजकीय थ्रिलर चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.
Maharashtra TimesAtul Kulkarni post: आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत आहोत, जेन झींना फुल्ल पाठिंबा देत अभिनेते अतुल कुलकर्णींची आणखी एक जळजळीत पोस्ट
पहिल्याच दिवशी देशात ४१ कोटींचा टप्पा पार
अनेक वाद, प्रदर्शनाच्या तारखेतील बदल आणि चित्रपट ऑनलाइन लीक होण्याच्या आव्हानांनंतरही ‘जन नायकन’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी केली. देशभरात सिनेमाचे तब्बल १३,०६७ शोज होते. Sacnilk रिपोर्टनुसार, चित्रपटानं पहिल्या दिवशी संपूर्ण भारतात ४१ कोटी रुपये आणि ४८.२७ कोटी रुपये ग्रॉस कमाई केली आहे.तमिळ भाषेत ३६.५० कोटी,तेलुगू – २.७५ कोटी,हिंदीत १.७५ कोटींची कमाई सिनेमानं केली आहे.

जगभरात ७८.२७ कोटींची कमाई
‘जन नायकन’ची क्रेझ केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. चित्रपटानं परदेशात ३० कोटी रुपयांची कमाई केली. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही परदेशाकला आकडा हा मोठा होता. देशातील तसंच परदेशातील कमाई मिळून सिनेमानं ७८ कोटींचा गल्ला जमवला आहे.
Maharashtra TimesRenuka Shahane :आमचं २५ वर्षांचं सुंदर नातं, पण आशुतोष यांना दिग्दर्शित करताना एक पत्नी म्हणून थोडी भीती होती, असं का म्हणाल्या रेणुका शहाणे?
सिनेमा लीक होऊनही थिएटर्स हाऊसफुल
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन लीक झाल्याची चर्चा होती आणि मद्रास उच्च न्यायालयात सांगण्यात आल्यानुसार जवळपास १.२ कोटी लोकांनी तो पाहिला होता. असं असूनही, मोठ्या पडद्यावर विजय यांची क्रेझ पाहायला मिळतेय.

चित्रपटात विजय यांच्यासोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज आणि गौतम वासुदेव मेनन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वीकेंडला या कमाईत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.