मुंबई: बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आलाय. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लक्षवेधी पोस्ट शेअर केल्यानंतर आता मध्यमरात्री त्यानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. सलमाननं जिम मधील काही फोटो शेअर केलेत, मात्र त्याचं कॅप्शन मात्र गोंधळात टाकणारं आहे.
आपल्या फिटनेस आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. सलमाननं मध्यरात्री ३-४ वाजता सोशल मीडियावर आपल्या वर्कआउटचे काही फोटो शेअर करत पुन्हा एकदा चाहत्यांचे आणि नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलेंआहे. पहाटेच्या सुमारास शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सलमानची रिप्ड आणि मस्क्युलर बॉडी स्पष्ट दिसत असून, त्यानें फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. Salman Khan : चेहऱ्यावर सुरकुत्या, पिकलेली दाढी… थकलाय सलमान खान? चिंतित फॅन्ससाठी अभिनेत्याची पोस्ट
सलमानने लिहिलं, की, ‘सलमान खान डर गया, हम्म्म…जो डर गया वो मर गया…’
“Salman Khan darrrrr gaya…. Hmmmm Jo darr gaya vo mar gaya..”
शोले सिनेमातला डायलॉग हा प्रसिद्ध संवाद १९७५ मधील आयकॉनिक चित्रपट ‘शोले‘ मधील असून, तो सलमानचे वडील सलीम खान आणि जावेद अख्तर (सलीम-जावेद) या जोडीनं लिहिला होता. सलमानच्या या रहस्यमय मेसेजमुळं तो त्याच्या टीकाकारांना अप्रत्यक्षपणे उत्तर देत असल्याचे बोललं जात आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांची गर्दी सलमानची ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. वयाच्या या टप्प्यावरही त्याचा असा कडक फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत, तर काही नेटकऱ्यांनी “नक्की कोणाला उद्देशून हा मेसेज आहे?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांत सलमान विविध सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसला होता. मात्र, या जिम फोटोमागे नक्की काय कारण आहे, याबाबत त्याने अधिक स्पष्टीकरण दिलेलं नाही.
वर्कफ्रंटबाबत अपडेट्स कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सलमान खान लवकरच रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या नवीन सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. याशिवाय, त्याचे आगामी काही ॲक्शनपटही रांगेत असून तो सध्या त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सच्या तयारीत व्यस्त आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा