Jana Nayagan Box office collection day 1: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार अभिनेते विजय यांचा ‘जन नायकन’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला आणि वादात अडकलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ जन नायकन ‘ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय. सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असून पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा गल्ला जमवण्यात सिनेमाला यश आलंय.
‘जन नायकन’ सिनेमा २३ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. विजय यांच्या अभिनयातील कारकिर्दीतील हा शेवटचा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. राजकीय थ्रिलर चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. Atul Kulkarni post: आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत आहोत, जेन झींना फुल्ल पाठिंबा देत अभिनेते अतुल कुलकर्णींची आणखी एक जळजळीत पोस्ट पहिल्याच दिवशी देशात ४१ कोटींचा टप्पा पार अनेक वाद, प्रदर्शनाच्या तारखेतील बदल आणि चित्रपट ऑनलाइन लीक होण्याच्या आव्हानांनंतरही ‘जन नायकन’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी केली. देशभरात सिनेमाचे तब्बल १३,०६७ शोज होते. Sacnilk रिपोर्टनुसार, चित्रपटानं पहिल्या दिवशी संपूर्ण भारतात ४१ कोटी रुपये आणि ४८.२७ कोटी रुपये ग्रॉस कमाई केली आहे.तमिळ भाषेत ३६.५० कोटी,तेलुगू – २.७५ कोटी,हिंदीत १.७५ कोटींची कमाई सिनेमानं केली आहे.
जगभरात ७८.२७ कोटींची कमाई ‘जन नायकन’ची क्रेझ केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. चित्रपटानं परदेशात ३० कोटी रुपयांची कमाई केली. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही परदेशाकला आकडा हा मोठा होता. देशातील तसंच परदेशातील कमाई मिळून सिनेमानं ७८ कोटींचा गल्ला जमवला आहे. Renuka Shahane :आमचं २५ वर्षांचं सुंदर नातं, पण आशुतोष यांना दिग्दर्शित करताना एक पत्नी म्हणून थोडी भीती होती, असं का म्हणाल्या रेणुका शहाणे? सिनेमा लीक होऊनही थिएटर्स हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन लीक झाल्याची चर्चा होती आणि मद्रास उच्च न्यायालयात सांगण्यात आल्यानुसार जवळपास १.२ कोटी लोकांनी तो पाहिला होता. असं असूनही, मोठ्या पडद्यावर विजय यांची क्रेझ पाहायला मिळतेय.
चित्रपटात विजय यांच्यासोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज आणि गौतम वासुदेव मेनन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वीकेंडला या कमाईत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा