Headlines

Suvrat Joshi on Narendra Modi Video;


Suvrat Joshi on Narendra Modi Video: मराठी सिनेविश्वातला अभिनेता सुव्रत जोशी सध्या चर्चेत आहे. देशात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर त्यानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

Suvrat Joshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते देशातील कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं असून, या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय स्तरातून पाठिंबा मिळत आहे. याच वेळी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अभ्यासू व लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशी यानंही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या या लढ्याला आपला पाठिंबा दिला होता.

गेल्या महिन्याभरापासून या मुद्द्यावर मौन बाळगल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री व्हिडिओ शेअर करत यावर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर नाराजीही दर्शवली आहे. या संदर्भात अभिनेता सुव्रत जोशीनं शेअर केलेली उपहासात्मक पोस्ट चर्चेत आली आहे.

Maharashtra TimesJana Nayagan collection: तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बॉक्स ऑफिसवर ‘विजय’, ‘जन नायकन’ नं पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई
Fraandsss, कालपर्यंत Chinese agent असलेल्या, साधे वैज्ञानिक म्हणायला लायक नसलेल्या, थेट पाकिस्तान मध्ये जाऊन कॉन्फरन्स केलेल्या, स्वतःच्या नावावर एकही पेटंट नसलेल्या, केवळ स्वतःच्या NGO ला परदेशी फंडिंग मिळणार नाही हा क्षुल्लक कारणावरून..शिक्षणाचे कारण देऊन उपोषणाला बसलेल्या सोनम जी वांगचुक यांना अचानक काल रात्री भाजप चे प्रमुख स्वतः जाऊन उपोषण तोडायला मदत करतात. माननीय पंतप्रधान त्यांना तब्येत सांभाळायला सांगतात. आणि त्यांच्याबद्दल गौरवास्पद बोलतात.

सोनम जी आता चीनचे एजंट आहेत की नाही? या मास्टर स्ट्रोक चा आम्ही आम्ही स्पिनर्स नी कसा अर्थ लावावा? सोनम जीना पाठिंबा दाखवणारे “आम्ही किडे” आता फुलपाखरू झालो का?

Maharashtra TimesAtul Kulkarni post: आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत आहोत, जेन झींना फुल्ल पाठिंबा देत अभिनेते अतुल कुलकर्णींची आणखी एक जळजळीत पोस्ट
कृपया ही पोस्ट अधिकाधिक शेअर करून या पामराच्या प्रश्नांना उत्तरं शोधून द्या! माझ्या वॉश्ड ब्रेनला पुन्हा मळवा!!! थांबा का यासाठी मला धुरंधर ३ ची वाट पहावी लागणार! ( आणि मी हे असे बोलल्याने आता पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्री मागे रहाणार, मला कुणीच नाही विचारणार,आदित्य धर आणि विवेक अग्निहोत्री तर नाहीच नाही… आणि हिंदी चित्रपट ५००० करोड कमावणार).

सुव्रतची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सही दिल्या आहेत.