Subodh Bhave in Gondavalekar Maharaj Role:अभिनेता सुबोध भावे सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’ यांच्या भूमिकेत दिसत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा एका अध्यात्मिक आणि ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रीलस्टार अथर्व सुदामे याच्या शॉर्ट फिल्ममध्ये सुबोध भावे ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ‘ यांची भूमिका साकारताना दिसत आहे. या शॉर्ट फिल्मचा पहिला लूक आणि त्यामागील भावूक प्रवास अथर्व सुदामेने सोशल मीडियावर शेअर केला असून, सुबोध भावेचा गोंदवलेकर महाराजांच्या रूपातील लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सुबोधला गोंदवलेकर महाराजांच्या रुपात पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
ब्रह्मचैतन्य असं अर्थवच्या या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. याचा एक टीझर समोर आल्यानंतर आता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांबद्दल सोशल मीडियावर बोललं जात आहे.
महाराष्ट्राच्या या पावन भूमीला महान संतपरंपरा लाभली आहे. त्यापैकीच एक श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज . सातारा जिल्ह्यातल्या ‘गोंदवले बुद्रुक’ या गावी माघ शुद्ध द्वादशी (१९ फेब्रुवारी १८४५) रोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव गणपती रावजी घुगरदवे असं होतं. लहानपणापासूनच त्यांच्या अंगी भगवद्भक्ती, परोपकार आणि तीव्र गुरुध्यासाचे संस्कार होते. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी गुरूच्या शोधात त्यांनी गृहत्याग केला आणि भारतभर भ्रमंती केली. या प्रवासात अनेक साधू-संतांच्या भेटी घेतल्यानंतर, येहळेगावचे श्री तुकामाई यांनी त्यांना अनुग्रह दिला आणि ‘ब्रह्मचैतन्य’ हे नाव दिलं. गुरुआज्ञेनं त्यांनी “श्रीराम जयराम जयजयराम” या त्रयोदशाक्षरी मंत्राचा प्रसार करण्याचं व्रत हाती घेतलं होतं.
Aga Aai Aaho Aai Review: सासू-सून ड्रामा नव्हे बरंच काही; कशी आहे हृता दुर्गुळेची ‘अगं आई, अहो आई’ वेब सीरिज? महाराजांनी दिक्षा घेतल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला. पण त्यांच्या पारमार्थिक जीवनावर त्याचा परिणाम झाला नाही. इ. स. १८७६ व १८९६ या सालांतील दुष्काळादरम्यान गोंदवल्यातील व आसपासच्या खेड्यातील लोकांसाठी त्यांनी आपली धान्याची कोठार खुली केली. गरिबांना, वृद्धांना मोफत अन्नदान केलं. म्हसवड गावात भरणाऱ्या बाजारात कसायांकडून गायी विकत घेऊन त्यांना जीवदान तर दिलंच पण त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांच्यासाठी गोशाळा बांधली, असं सांगितलं जातं. संसार सोडून जंगलात जाण्याची अजिबात गरज नाही, असं महाराज ठामपणे सांगत. प्रपंचात आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडा..असं त्यांचा विचार होता.
मार्गशीर्ष वद्य दशमी (२२ डिसेंबर १९१३) रोजी महाराजांनी गोंदवले इथं देह ठेवला. आज गोंदवले हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून, हजारो साधकांसाठी शांतता आणि समाधानाचा अक्षय स्रोत बनलं आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा