IND vs ZIM Vaibhav Sooryavanshi News : इंग्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये अपयशी ठरल्यामुळे टीका करणाऱ्यांना वैभवने पहिल्याच सामन्यात आपल्या बॅटने उत्तर दिलेय. अवघ्या १८ चेंडूत त्याने अर्धशतक केले असून इतिहास रचला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू पहिला टी-२० सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वे संघ २० ओव्हरमध्ये १२५-७ धावा करू शकला. वेस्ली माधेवरे याने सर्वाधिक ३९ धावा तर तादिवानाशे मारुमणीने २७ धावा करत संघाला १००चा टप्पा पार करून दिला. बॅटिंगला उतरल्यावर वैभव याने १८ चेंडूत अर्धशतक ठोकत इतिहास रचला आहे. पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकणारा जगातील सर्वात तरूण फलंदाज ठरला आहे.
प्रिन्स यादव याच्या पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर बेन कुरन १० धावांवर असताना चौकार मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. सामन्याच्या चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर बेन कुरनने मारलेला फटका हवेत होता, मात्र वैभवने एक झकास घेत प्रिन्सला विकेट मिळवून दिली. भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेचा अर्धा संघ ६४ धावांवर माघारी पाठवला होता. तर भारताकडून दोन्ही यादव बंधूंनी दोन-दोन विकेट घेतल्या. आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने एक कमाल कॅच पकडला. मयंक यादव आण प्रिन्स यादव या दोघांनी सुरूवातीपासूनच झिम्बाब्वेला धक्क्यावर धक्के दिले. त्यासोबतच रवी बिश्नोई आणि शिवम दुबे यांनी एक-एक विकेट नावावर केली. India vs Zimbabwe : श्रेयसचा निर्णय योग्य ठरला; भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 125 धावांतच रोखलं, मयंक-प्रिन्सचा धुमाकूळ भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या ओव्हरमध्ये षटकार चौकारमार धडाक्यात सुरुवात केली होती. वैभवने दुसऱ्या ओव्हरपासूनच त्याने चाबूक ओढायला सुरूवात केली. पठ्ठ्याने १८ चेंडूत ५० धावा करताना पहिे आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक पूर्ण करताना त्याने चार चौकार आणि चार षटकार मारले. अर्धशतक पूर्ण केल्यावर मोठा फटका खेळण्याच्या नादात १९ व्या चेंडूवर कॅच आऊट झाला. या अर्धशतकासह वैभवने इतिहास रचला आहे. IND vs ZIM : भारत वि. झिम्बाब्वे टी-20 मॅच सुरू, 150 पेक्षा वेगाने टाकणाऱ्या बॉलरचा डेब्यू; कॅप्टन अय्यरला पहिल्या विजयाची आस वैभव सूर्यवंशी हा पहिले अर्धशतक करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. वैभवने १५ वर्ष ११८ दिवसांचा असताना पहिले आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक ठोकले आहे. याआधी हा विक्रम जिब्राल्टरच्या लुईस ब्रुस याच्या नावावर होता. लुईस ब्रुस याने माल्टाविरूद्ध १६ वर्ष ५६ दिवसांचा असताना अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र आता हा विक्रम वैभवच्या नावावर झाला आहे.
पहिले टी-२० अर्धशतक करणारा सर्वात तरूण खेळाडू 15y 118d – वैभव सूर्यवंशी (भारत) वि. झिम्बाब्वे, हरारे, 2026 16y 56d – लुईस ब्रुस (जिब्राल्टर) वि. माल्टा, अल्बर्गरिया, 2021 16y 76d – काविन चड्ढा (इंडोनेशिया) वि. स्वीडन, बाली, 2026 16y 89d – अल्युसिन तुरे (सिएरा लिओन) वि. घाना, बेनोनी, 2023 16y 118d – तेन्जिन राब्गे (भूतान) वि. चीन, क्वालालंपूर, 2023
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा