नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 95 टक्के भरले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तसेच इगतपुरीत मुसळधार पावसामुळे काही नागरीक पुराच्या पाण्यात अडकले होते. या नागरिकांची प्रशासनाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरण हे तब्बल 95 टक्के भरले आहे. मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. तसेच दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं आहे. मुसळधार पाऊस असाच सुरु राहिला तर गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदाच्या पावसाला सुरू होऊन देखील पाहिजे तेवढाच पाऊस न झाल्याने नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली नव्हती. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून आठवड्याच्या दर शनिवारी पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दर शनिवारी पाणी कपात ही लागू करण्यात आली होती. मात्र आता ही पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. नाशिकच्या महापौर हीमगौरी अडके-आहेर यांच्याकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
पाणीकपात रद्द, नाशिककर आनंदी
22 आणि 23 जुलै रोजी नाशिक शहरात आणि नाशिक शहरातला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू होती. यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत 95 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे नाशिक महानगर पालिकेकडून नाशिकरांवर लावण्यात आलेली पाणीकपात ही रद्द करण्यात आली आहे. नाशिक शहराच्या महापौर हीमगौरी अडके – आहेर यांच्याकडून पाणीकपात रद्द करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नाशिकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नाशिकच्या इगतपुरीत पुराच्या पाण्यात नागरीक अडकले
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे पिंपरी शिवारातील नदी लगत असलेल्या आदिवासी कुटुंबाच्या घरात पाणी शिरले. यामुळे तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, फांगुळगाव येथील आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी भर पावसात आदिवासी कुटुंबाचे रेस्क्यू केले.
16 जणांचा सुखरुप सुटका
बचाव पथकातील जवानांनी छाती एवढ्या पाण्यात उतरून लाईफ जॅकेट आणि दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले. यामध्ये लहान मुले, वृद्ध, महिला अशा एकूण 16 जणांसहित श्वानाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. रेसक्यू केलेल्या आदिवासी बांधवांची माहेश्वरी मंगल कार्यालयात येथे राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा