Betrayed by trust after 5 days a friendship leads to theft of valuables worth 1 lakh; मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
Betrayed by trust after 5 days a friendship leads to theft of valuables worth 1 lakh; मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मार्केटिंगचे काम करणाऱ्या एका महिलेशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत, तिच्या मित्राने चार ते पाच दिवस तिच्यासोबत घरात घालवली. जाताना, महिलेशी वाद घालून तिला मारहाण करून तिच्याजवळील एक लाख ११ हजाराचे दागिने हिसकावून नेले. ही घटना एन ७, सिडको येथे घडली. महिलेचे दागिने हिसकाविणाऱ्याचे नाव मोहित भिकुलाल भंडारी असे आहे.
या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर महिला ही एन ६ सिडको येथे एका घरात सदर महिला राहत असताना, तिची ओळख मोहित भिकुलाल भंडारी याच्याशी झाली. मोहित भंडारी याच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मोहितने तिला एक रूम एन ७ भागात घेण्याचे सांगितले. एन ७ सिडको विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पाठीमागे सागर भराटी याच्याकडे ही रूम घेतली. ही रूम घेतल्यानंतर १८ जूनपासून सदर महिला आणि मोहित भंडारी हे दोघे चार ते पाच दिवस सोबत एकत्र राहिले.
हे दोघे सोबत राहत असताना, मोहित भंडारी याने तिच्याजवळ एक पेटी पाहिली. या पेटीमध्ये सोन्या चांदीचे दागिने होते. २३ जून रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान मोहित भंडारी याने सदर महिलेसोबत वाद घातला. यानंतर मोहित याने तिला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याजवळ असलेल्या सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच पर्समधील रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन निघून गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा मुद्देमाल नेला चोरून
सोन्याचा नेकलेस – १८ ग्रॅम किंमत अंदाजे तीस हजार रुपये, कानातले – ५.१ ग्रॅम किंमत अंदाजे दहा हजार रुपये, मोठे मंगळसूत्र – ६.५ ग्रॅम , दोन अंगठी – चार हजार रुपये, सोन्याची चैन त्यामध्ये एक पेंडल ६.५ ग्रॅम , चार ओम – दोन हजार रुपये, लहान मुलीचे कानातले सोन्याचे ४.५ ग्रॅम, चांदीचे पैजण चार जोडी- दोन हजार रुपये. लहान मुलांचे हाताचे व पायाचे कडे, व कंबरचैन- पाच हजार रुपये, जोडवी ६ जोड- तीन हजार रुपये, पर्समध्ये पंचवीस हजार रुपये रोख रक्कम, एकूण – एक लाख ११ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा