Headlines

श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा विक्रम; टी-20 कर्णधार म्हणून रचला ऐतिहासिक विक्रम


Shreyas Iyer toss record : गेल्या सात सामन्यांपासून कर्णधार म्हणून विजयाची प्रतीक्षा असलेल्या श्रेयस अय्यरने अखेर आजचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकला आहे. टॉस जिंकताच त्याने एक मोठा विक्रम मागे टाकला.

shreyas iyer breaks ms dhoni toss record
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांचं लक्ष युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लागलं होतं. मात्र, सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. हरारे स्पोर्ट्स क्लबवर टॉस जिंकताच अय्यरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग सर्वाधिक टॉस जिंकण्याचा भारतीय विक्रम मोडला. त्याने महान कर्णधार एमएस धोनीचा १४ वर्षे जुना विक्रम मागे टाकला. कर्णधार म्हणून अय्यरला पहिल्या आंतरराष्ट्रीय विजयाची प्रतीक्षा लागली होती. जी आजचा सामना जिंकल्याने पूर्ण झाली आहे. अन् दुसरीकडे नाणेफेकीत त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे.

धोनीचा १४ वर्षे जुना विक्रम मोडला

झिम्बाब्वेविरुद्ध टॉस जिंकताच श्रेयस अय्यरने भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग आठ टॉस जिंकण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने मे २०१० ते फेब्रुवारी २०१२ या कालावधीत सलग सात सामन्यांमध्ये टॉस जिंकला होता. मात्र, श्रेयसने आयर्लंडविरुद्ध २६ जून २०२६ रोजी कर्णधारपदाची सुरुवात केल्यानंतर सलग आठ सामन्यांमध्ये टॉस जिंकत धोनीचा विक्रम मोडला.

Maharashtra TimesIND vs ZIM 1st T20 : वर्ल्ड कपनंतर भारताचा पहिलाच विजय, झिम्बाब्वे 7 विकेटने पराभूत; श्रेयसने खातं उघडलं, मॅन ऑफ द मॅच कोण?

भारताच्या कर्णधारांमध्ये श्रेयस अव्वल

टी-२० कर्णधार म्हणून सलग सर्वाधिक टॉस जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत श्रेयस अय्यर आता पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर एमएस धोनीने सलग सात टॉस जिंकले होते. विराट कोहलीने सलग सहा, तर रोहित शर्माने सलग पाच टॉस जिंकले होते. त्यामुळे अय्यरने या सर्व दिग्गजांना मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.

Maharashtra TimesWorld Test Championship : विराट-रोहित नाही, 9 जूनपासून द ओव्हलवर WTCची फायनल; पाचव्या स्थानावरील भारताला अंतिम फेरी गाठता येणार?

जागतिक विक्रमापासून अय्यर दूर

जागतिक स्तरावर मात्र वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीच्या नावावर सलग १० टॉस जिंकण्याचा विक्रम आहे. अय्यरने सलग आठ टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कर्णधार म्हणून अय्यरची मैदानावरील कामगिरी अद्याप अपेक्षेप्रमाणे झालेली नव्हती. जून २०२६मध्ये सूर्यकुमार यादवकडून नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारताने त्याच्या नेतृत्वाखाली सात सामन्यांपैकी सहा सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर आजचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना श्रेयससाठी पहिला आंतरराष्ट्रीय विजय मिळवणारा ठरला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा