Mumbai fda tukaram mundhe major raid on 10 hotels includes iit canteen 22 arrested; तुकाराम मुंढेंचा मुंबईत मोठा दणका: IIT मुंबईच्या कॅन्टिनसह १० हॉटेलवर धाडी, ५ परवाने निलंबित
Mumbai fda tukaram mundhe major raid on 10 hotels includes iit canteen 22 arrested; तुकाराम मुंढेंचा मुंबईत मोठा दणका: IIT मुंबईच्या कॅन्टिनसह १० हॉटेलवर धाडी, ५ परवाने निलंबित
मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या धाडसत्राने आणखीनच वेग पकडला असून मागील दोन दिवसांत २२ जणांना अटक करण्यात आली असून अनेक हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. राजधानी मुंबईतही कारवाईचा धडाका सुरू असून आयआयटी मुंबईसह इतर १० हॉटेलवर धाडी टाकत कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट यादरम्यान एकूण १० हॉटेल / रेस्टॉरंट/ कॅन्टीन आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ अन्न आस्थापनांचे परवाना निलंबन करण्यात आले, ५ अन्न आस्थापनेस व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली व एका अन्न आस्थापनेस सुधारणा नोटीस देण्यात आल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.
एफडीएने ४ ऑगस्टपासून टाकलेल्या धाडींमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा विक्री, वितरण, वाहतूक प्रकरणी २२ व्यक्तींना अटक करून एकूण २० लाखांहून अधिक किंमतीचा साठा जप्त केला आहे. तसंच इतर अन्नपदार्थांचा (दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, मसाले, खाद्यतेल इत्यादी अन्नपदार्थ) सुमारे २ कोटी ६२ लाख ७० हजार १७४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आयआयटी मुंबईच्या कॅन्टिनवर कारवाई
एफडीएकडे आलेल्या तक्रारीनुसार आयआयटी मुंबई, पवई येथे ३ हॉस्टेल मेसच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणी दरम्यान दोन ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्या अंतर्गत बंधनकारक असल्येल्या अन्न परवाना / नोंदणी नसल्याचं आढळून आल्याने सदर दोन मेस येथील अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तर तिसऱ्या मेसमध्ये आढळून अल्येल्या त्रुटींच्या अनुषंगाने सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबईतील कोणत्या हॉटेलवर कारवाई?
मुंबईतील चार हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. यामध्ये दादरमधील Eat Nino या हॉटेलचा समावेश आहे. इथं तपासणी दरम्यान अस्वच्छ परिस्थिती, कीटकांचा (घरमाशांचा) वावर, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचा अभाव, अन्नाची आणि पिण्याच्या पाण्याची अनिवार्य चाचणी केल्याच्या नोंदी नसणे, FOSTAC प्रशिक्षण व वैद्यकीय नोंदी उपलब्ध नसणे, तसेच GMP आणि GHP पद्धतींची अंमलबजावणी न करणे, इ. उल्लंघने आढळून आल्यामुळे परवाना निलंबन करण्यात आले. दुसरी कारवाई अंधेरी पश्चिम येथील जय माँ काली ढाब्यावर कारवाई करण्यात आली. या ढाब्यामध्ये खराब अवस्थेत असलेल्या प्लायवूड रॅकचा उपयोग केला गेला आहे जे दुरवस्थेत आहेत. अन्न साठवणूक ही टॉयलेटच्या बाजूलाच केली असून तेथील रॅक सुद्धा गंजलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. वापरण्यात आलेल्या रेफ्रिजरेटर वर तापमान दर्शवणारे डिजिटल मीटर अस्तित्वात नाहीत असे आढळले. सदर आस्थापनेतील किचनच्या भिंती या अस्वच्छ असल्याचे आढळून आले. सदर आस्थापनेच्या किचनच्या टेबलावर मळलेली कणिक ही उघड्या अवस्थेत व त्यावर माशा बसलेल्या आढळून आल्या, इ. उल्लंघने आढळून आल्यामुळे परवाना निलंबन करण्यात आले. तिसरी कारवाई सांताक्रूझ पश्चिमेतील हाऊस ऑफ महाराष्ट्रवर करण्यात आली. इथं स्वयंपाकघराच्या परिसरात झुरळांचा वावर तसेच स्टोर रूममध्ये झुरळांचा अति प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले. पॅकेजिंग साहित्य फूड ग्रेड म्हणून प्रमाणित नाही आणि वर्तमान पत्र फूड पॅकिंग वापरतात. पेस्ट कंट्रोल केल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. स्टोर रूममधील सिलिंगचे पेंट निघून पापुद्रे पडत असल्याचे आढळले. स्वयंपाकाची उपकरणे गंजलेली आढळली, इ. उल्लंघने आढळून आल्यामुळे परवाना निलंबन करण्यात आले.
दरम्यान, कुर्ला वेस्ट येथील साऊत इंडियन डोसा कॉर्नरवरही कारवाई करण्यात आली. सदर हॉटेलच्या तपासणी दरम्यान कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी/लसीकरणाच्या नोंदी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले नाही तसेच प्रशिक्षणाच्या नोंदी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. उपकरणे व आस्थापनेची स्वच्छता निर्धारित स्वच्छता कार्यक्रमानुसार करण्यात येत नसल्याचे आढळून आले. आवश्यक अभिलेख (Records) व दस्तऐवज उपलब्ध ठेवण्यात व जतन करण्यात आलेले नाहीत, इ. सुधारणा नोटीस मध्ये नमूद केलेल्या तुटींची विहित मुदतीत पूर्तता न केल्यामुळे परवाना निलंबन करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा