Headlines

vat purnima ukhane 2026: नवीन नवरीपासून ते जेष्ठ महिलांपर्यंत, लाडक्या नवरोबाचे नाव घेण्यासाठी टॉप २५ उखाणे! – easy vat purnima ukhane in marathi for female vat purnima ukhane 2026


वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात. या सणातील एक खास आकर्षण म्हणजे उखाणे. नवऱ्याचे नाव थेट न घेता काव्यात्मक, विनोदी आणि गोड पद्धतीने नाव घेण्याची ही सुंदर मराठी परंपरा आहे.आजकाल पारंपरिक उखाण्यांसोबतच हलकेफुलके, मजेशीर आणि सहज लक्षात राहतील असे उखाणेही महिलांच्या पसंतीस उतरतात. जर तुम्ही यंदाच्या वटपौर्णिमेसाठी नवीन, सोपे आणि फनी उखाणे शोधत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी.

Vat Pournima ukhane in Marathi
फोटो सौजन्य :- @iampoojasawant, iStock
वटपौर्णिमा म्हणजे सुवासिनी महिलांसाठी अत्यंत उत्साहाचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा सण. या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पारंपरिक नऊवारी साडी, हिरवा चुडा, नथ, गजरा आणि कुंकवाने सजलेल्या महिलांमुळे या सणाचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. पूजा, वडाला प्रदक्षिणा, हळदीकुंकू आणि मैत्रिणींसोबतच्या गप्पा यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरतो.

या सणातील आणखी एक खास आणि जपलेली परंपरा म्हणजे उखाणा घेणे. नवऱ्याचे नाव थेट न घेता काव्यात्मक, प्रेमळ आणि चतुराईने त्याचे नाव घेण्याची ही मराठी संस्कृतीतील अनोखी परंपरा आहे. पूजा करताना, वडाला प्रदक्षिणा घालताना किंवा घरी कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर “नाव घ्या… नाव घ्या…” असा आग्रह झाला की अनेक महिलांची थोडीशी तारांबळ उडते. अशा वेळी एखादा सुंदर, हटके किंवा मजेशीर उखाणा आठवला, तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू फुलते.

आजच्या काळात पारंपरिक उखाण्यांसोबतच आधुनिक आणि हलक्याफुलक्या शैलीतील उखाण्यांनाही मोठी पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर वटपौर्णिमेचे फोटो शेअर करताना, स्टेटस किंवा रील्ससाठीही अनेक महिला हटके आणि विनोदी उखाणे शोधत असतात. त्यामुळे यंदाच्या वटपौर्णिमेसाठी आम्ही खास तुमच्यासाठी निवडले आहेत रोमँटिक, सोपे, पारंपरिक आणि फनी असे भन्नाट उखाणे, जे प्रत्येक वयोगटातील महिलांना आवडतील. (फोटो सौजन्य :- @iampoojasawant)

नवीन नवरीसाठी सोपे आणि गोड उखाणे

नवीन नवरीसाठी सोपे आणि गोड उखाणे

इन्स्टाग्रामवर रिल्स बघते मी रोज, संसारात माझ्या आहे वेगळीच मौज …. रावांचे नाव घेण्याची मला आहे खूप हौस

फनी आणि हटके उखाणे

फनी आणि हटके उखाणे

“वडाच्या झाडाला गुंडाळते सुताचा धागा,
…रावांचे नाव माझ्या हृदयात, त्यांनाच पहिली जागा.”

वटपौर्णिमेसाठी उखाणे

वटपौर्णिमेसाठी उखाणे

“मखमली पेटीत ठेवलेत हिरे आणि मोती,
…रावांच्या संसारात मी आहे भाग्यवान ज्योती.”

पारंपरिक उखाणा

पारंपरिक उखाणा
  • “हिरव्यागार साडीवर शोभतो जरीचा काठ,
    …रावांसोबत सुरु झाली माझ्या आयुष्याची नवी वाट.”
  • “पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो सुंदर,
    …रावांचे नाव घेताना मन माझे प्रसन्न निरंतर.”

भक्तिमय उखाणा

भक्तिमय उखाणा

“वटपौर्णिमेचे व्रत करून मागते एकच वर,
…रावांचे प्रेम लाभो मला जन्मोजन्मी अपार.”

फनी उखाणा

फनी उखाणा

“चांदीच्या ताटात ठेवलेत पेढे,
…राव आहेत स्वभावाने थोडे वेढे.”

वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणा

वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणा

“सोन्याची अंगठी, मोत्याचा तोडा,
…आणि माझी आहे देव करो ही जोडी सदा.”

वटपौर्णिमा स्पेशल गोड उखाणा

वटपौर्णिमा स्पेशल गोड उखाणा

“गुलाबाचे फूल दिसायला खूप छान,
…रावांनी राखला माझ्या माहेरचा मान.”

वटपौर्णिमा स्पेशल पारंपरिक उखाणा

वटपौर्णिमा स्पेशल पारंपरिक उखाणा

“मंगळसूत्राच्या दोन वाट्या, माहेर आणि सासर,
…रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा वासर.”

वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणा

वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणा

“वडाच्या झाडाची मनोभावे करते पूजा,
…रावांच्या संसारात मी आहे राणी, माझ्यावर हक्क नाही दुजा.”

वटपौर्णिमा स्पेशल पारंपरिक उखाणा

वटपौर्णिमा स्पेशल पारंपरिक उखाणा

“हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…रावांचे नाव घेते, सुखात जावो आमचे पुढचे साल.”

वटपौर्णिमा स्पेशल मजेशीर उखाणा

वटपौर्णिमा स्पेशल मजेशीर उखाणा

“चहामध्ये साखर, साखरेमध्ये चहा,…राव गेले ऑफिसला, मला म्हणतात घरीच राहा!”

वटपौर्णिमा स्पेशल फनी उखाणा

वटपौर्णिमा स्पेशल फनी उखाणा

“काजू-बदाम खाऊन तब्येत होते भारी,
…राव माझे एकदम सरळ, मीच आहे त्यांच्यावर भारी!”

वटपौर्णिमा स्पेशल मजेशीर उखाणा

वटपौर्णिमा स्पेशल मजेशीर उखाणा

“टिव्हीवर बघते मी ‘स्टार प्रवाह’च्या मालिका,
…रावांच्या खिशातील पैशांची मीच आहे चालती-बोलती मलिका!”

वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणे

वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणे
  • “संसाराच्या वेलीवर फुलली दोन फुले,
    …रावांचे नाव घेताना मन माझे सुखाने डुले.”
  • “पिढ्यानपिढ्या चालत आली वटपौर्णिमेची रीती,
    …रावांच्या साथीने आयुष्याची झाली सुंदर गती.”
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा