वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात. या सणातील एक खास आकर्षण म्हणजे उखाणे. नवऱ्याचे नाव थेट न घेता काव्यात्मक, विनोदी आणि गोड पद्धतीने नाव घेण्याची ही सुंदर मराठी परंपरा आहे.आजकाल पारंपरिक उखाण्यांसोबतच हलकेफुलके, मजेशीर आणि सहज लक्षात राहतील असे उखाणेही महिलांच्या पसंतीस उतरतात. जर तुम्ही यंदाच्या वटपौर्णिमेसाठी नवीन, सोपे आणि फनी उखाणे शोधत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी.

या सणातील आणखी एक खास आणि जपलेली परंपरा म्हणजे उखाणा घेणे. नवऱ्याचे नाव थेट न घेता काव्यात्मक, प्रेमळ आणि चतुराईने त्याचे नाव घेण्याची ही मराठी संस्कृतीतील अनोखी परंपरा आहे. पूजा करताना, वडाला प्रदक्षिणा घालताना किंवा घरी कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर “नाव घ्या… नाव घ्या…” असा आग्रह झाला की अनेक महिलांची थोडीशी तारांबळ उडते. अशा वेळी एखादा सुंदर, हटके किंवा मजेशीर उखाणा आठवला, तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू फुलते.
आजच्या काळात पारंपरिक उखाण्यांसोबतच आधुनिक आणि हलक्याफुलक्या शैलीतील उखाण्यांनाही मोठी पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर वटपौर्णिमेचे फोटो शेअर करताना, स्टेटस किंवा रील्ससाठीही अनेक महिला हटके आणि विनोदी उखाणे शोधत असतात. त्यामुळे यंदाच्या वटपौर्णिमेसाठी आम्ही खास तुमच्यासाठी निवडले आहेत रोमँटिक, सोपे, पारंपरिक आणि फनी असे भन्नाट उखाणे, जे प्रत्येक वयोगटातील महिलांना आवडतील. (फोटो सौजन्य :- @iampoojasawant)
नवीन नवरीसाठी सोपे आणि गोड उखाणे
इन्स्टाग्रामवर रिल्स बघते मी रोज, संसारात माझ्या आहे वेगळीच मौज …. रावांचे नाव घेण्याची मला आहे खूप हौस
फनी आणि हटके उखाणे
“वडाच्या झाडाला गुंडाळते सुताचा धागा,
…रावांचे नाव माझ्या हृदयात, त्यांनाच पहिली जागा.”
वटपौर्णिमेसाठी उखाणे
“मखमली पेटीत ठेवलेत हिरे आणि मोती,
…रावांच्या संसारात मी आहे भाग्यवान ज्योती.”
पारंपरिक उखाणा
- “हिरव्यागार साडीवर शोभतो जरीचा काठ,
…रावांसोबत सुरु झाली माझ्या आयुष्याची नवी वाट.” - “पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो सुंदर,
…रावांचे नाव घेताना मन माझे प्रसन्न निरंतर.”
भक्तिमय उखाणा
“वटपौर्णिमेचे व्रत करून मागते एकच वर,
…रावांचे प्रेम लाभो मला जन्मोजन्मी अपार.”
फनी उखाणा
“चांदीच्या ताटात ठेवलेत पेढे,
…राव आहेत स्वभावाने थोडे वेढे.”
वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणा
“सोन्याची अंगठी, मोत्याचा तोडा,
…आणि माझी आहे देव करो ही जोडी सदा.”
वटपौर्णिमा स्पेशल गोड उखाणा
“गुलाबाचे फूल दिसायला खूप छान,
…रावांनी राखला माझ्या माहेरचा मान.”
वटपौर्णिमा स्पेशल पारंपरिक उखाणा
“मंगळसूत्राच्या दोन वाट्या, माहेर आणि सासर,
…रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा वासर.”
वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणा
“वडाच्या झाडाची मनोभावे करते पूजा,
…रावांच्या संसारात मी आहे राणी, माझ्यावर हक्क नाही दुजा.”
वटपौर्णिमा स्पेशल पारंपरिक उखाणा
“हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…रावांचे नाव घेते, सुखात जावो आमचे पुढचे साल.”
वटपौर्णिमा स्पेशल मजेशीर उखाणा
“चहामध्ये साखर, साखरेमध्ये चहा,…राव गेले ऑफिसला, मला म्हणतात घरीच राहा!”
वटपौर्णिमा स्पेशल फनी उखाणा
“काजू-बदाम खाऊन तब्येत होते भारी,
…राव माझे एकदम सरळ, मीच आहे त्यांच्यावर भारी!”
वटपौर्णिमा स्पेशल मजेशीर उखाणा
“टिव्हीवर बघते मी ‘स्टार प्रवाह’च्या मालिका,
…रावांच्या खिशातील पैशांची मीच आहे चालती-बोलती मलिका!”
वटपौर्णिमा स्पेशल रोमँटिक उखाणे
- “संसाराच्या वेलीवर फुलली दोन फुले,
…रावांचे नाव घेताना मन माझे सुखाने डुले.” - “पिढ्यानपिढ्या चालत आली वटपौर्णिमेची रीती,
…रावांच्या साथीने आयुष्याची झाली सुंदर गती.”

