Headlines

Surgana Crime: मध्यरात्री साधला डाव, सुरगाण्यात वृद्ध दाम्पत्याला निर्घृणपणे संपवलं, नातवासह नातसून पोलिसांच्या ताब्यात – surgana elderly couple killed with sharp weapon grandson-granddaughter in law committed crime


Surgana Crime: सुरगाणा तालुक्यात मध्यरात्री घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याची नातू अन् नातसुनेनं हत्या केल्याची घटना घडली आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-28T115945
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, कळवण/दिंडोरी: सुरगाणा तालुक्यातील केळुणे गावात मंगळवारी मध्यरात्री घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू आणि नातसुनेला ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सखाराम गावित (वय ६६) आणि बायजाबाई गावित (वय ६३, रा. केळुणे) हे घरात झोपलेले असताना मंगळवारी (दि. २५) रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Maharashtra TimesNagpur Crime : पतीचं निधन, पदरी दोन मुलं; लग्नाच्या आमिषाने 26 वर्षीय महिलेवर अत्याचार, महाराष्ट्रातील राज्यमंत्र्याच्या बॉडीगार्डवर गुन्हाही घटना बुधवारी (दि. २६) सकाळी उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. पोलिस पाटील बापूराव भोये यांनी सुरगाणा पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रशांत अहिरे, पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले.

ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Maharashtra TimesJalgaon News: रक्षाबंधनापूर्वीच दोन कुटुंबांवर शोककळा; बापलेकाचा बुडून, तर तरुणाचा विजेच्या धक्क्याने करुण अंत, जळगाव हळहळलं…या कारणामुळे टोकाचे पाऊल

तपासादरम्यान पोलिसांनी मृतांचे नातू देवीदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देवीदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोघांनीही संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत दाम्पत्य दररोज मद्यपान करून शिवीगाळ व वाद घालत असल्याने घरात सतत तणावाचे वातावरण निर्माण होत होते. रोजच्या कटकटीला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी हत्या केल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra TimesNepal Flood : साहसी गिर्यारोहक डॉ. चितळेंसह 61 जणांचा ग्रुप बेपत्ता, मानसरोवर यात्रेवेळी संपर्क तुटला, क्लिनिकबाहेर नोट वाचून रुग्ण हवालदिलओझरमध्ये तरुणाचा गळा आवळून खून

ओझरमधील कासागल्ली परिसरात एका तरुणाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. विनोद विष्णू शेंद्रे (वय ३४, रा. बाजारपेठ, ओझर) असे तरुणाचे नाव आहे. कासागल्ली येथे अमोल पावटे यांच्या भाड्याने दिलेल्या घरात विनोद शेंद्रेचा मृतदेह आढळला. बुधवारी (दि.२६) रात्री साडेदहा वाजेपासून ते गुरुवारी (दि.२७) सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या काळात दोरीने विनोदचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज आहे. विनोद हा मूळचा कळमगाव, तालुका यवतमाळ येथील असून, तो ओझर येथे एका किराणा दुकानात काम करीत होता. या प्रकरणी मित्र रवींद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनोदसोबत खोलीत राहणारा त्याचा मित्र परागंदा झाल्याची माहिती आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा