Chhatrapati Sambhajinagar Kannad 30 Year Old Ankush Ravte Died while Working Out at Gym; पुतणीला शाळेत सोडलं अन् जिम गाठली, व्यायाम करताना 30 वर्षीय तरुण कोसळला, हॉस्पिटलमध्ये पोहोचताच प्राणज्योत मालवली; चिमुकलींचं छत्र हरपलं
Chhatrapati Sambhajinagar Kannad 30 Year Old Ankush Ravte Died while Working Out at Gym; पुतणीला शाळेत सोडलं अन् जिम गाठली, व्यायाम करताना 30 वर्षीय तरुण कोसळला, हॉस्पिटलमध्ये पोहोचताच प्राणज्योत मालवली; चिमुकलींचं छत्र हरपलं
Chhatrapati Sambhajinagar Gym Youth Dies : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जीममध्ये वर्कआऊट करताना एक तरुण अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिममध्ये कोसळून तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सकाळी नेहमीप्रमाणे दिनक्रम सुरू असताना अचानक घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जिममध्ये नियमित वर्कआऊट करत असताना एका 30 वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन मृत्यू झाला. ही घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. रोजच्या सवयीनुसार व्यायामासाठी गेलेल्या तरुणाला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, या घटनेमुळे बहिरगाव आणि कन्नड शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अंकुश कडूबा रावते (वय 30, रा. बहिरगाव, ता. कन्नड) असं मृत तरुणाचं नाव आहे.
अचानक चक्कर येऊन खाली कोसळला
दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश रावते हा बहिरगाव ते पाणपोई फाटा रस्त्यावरील बळीराजा नर्सरीचा मालक होता. तो अत्यंत मेहनती आणि मनमिळाऊ स्वभावाचा तरुण म्हणून परिसरात ओळखला जात होता. सकाळी त्याने नेहमीप्रमाणे आपल्या पुतणीला आनंदाने शाळेत सोडलं. त्यानंतर तो आपल्या दिनक्रमाप्रमाणे कन्नड शहरातील एका खासगी जिममध्ये व्यायामासाठी पोहोचला. तिथे नेहमीप्रमाणे त्याने वर्कआऊट सुरू केलं. मात्र, सकाळी सात वाजेच्या सुमारास व्यायाम करत असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि तो अचानक चक्कर येऊन खाली कोसळला.
अंकुश अचानक खाली पडल्याचं पाहताच जिममधील इतर सदस्यांनी आणि मित्रांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेतली. त्याना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं उपस्थितांनी क्षणाचाही विलंब न करता त्याना बेशुद्ध अवस्थेत कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने तपासणी केली, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
सध्याच्या धावपळीच्या युगात अवघ्या 30व्या वर्षी अंकुश याच्यासारख्या तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्यानं त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. अंकुश रावते याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुली आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कमावत्या आणि चिमुकल्यांचं छत्र हरपल्यानं रावते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्या 22 वर्षांच्या एका तरुणीचं आमिष दाखवून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मे 2024 पासून बेपत्ता असलेल्या या विद्यार्थिनीचा कोणताही सुगावा लागत नव्हता. मात्र, तिच्या एका मैत्रिणीने दिलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीमुळे या प्रकरणाच्या तपासाला अचानक वेगळं वळण मिळालं. हतबल वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात रोहित राजपूत नावाच्या संशयित तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा