Headlines

Samruddhi Highway: महामार्गावर चोरट्यांची ‘समृद्धी’; टायर पंक्चरचा सापळा रचून 18 लाख लुटले, वकिलाच्या कुटुंबाला मारहाण – samruddhi highway robbery puncture tires of moving vehicle loot 18 lakh


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: तालुक्यातील समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर फोडून प्रवाशांना लुटण्याच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. मलढोण आणि दुशिंगवाडी शिवारातील चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान अंधारात दरोडेखोरांच्या टोळीने चार वाहनांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वकिलाच्या कुटुंबाला घेरून मारहाण करीत १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. दरम्यान, आणखी एका वाहनाचे टायर फोडून लूट करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील ॲड. श्रीकांत मिश्रा हे कुटुंबीयांसह कारने (एमएच २० जीके ०२०२) मुंबईकडे जात होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या कारच्या टायरला लोखंडी वस्तू आदळल्याने टायर फुटले. मिश्रा यांनी प्रसंगावधान राखत वाहनाचा वेग कमी करून कार थांबवली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळीने कारला घेरले.

Maharashtra TimesNashik News: आधी गिरीश महाजनांचा टोमणा, नंतर भुजबळांनीकडून सव्याज परतफेड; मुख्यमंत्र्यांसमोरच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजीदरोडेखोरांनी लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मिश्रा यांना मारहाण केली. तसेच कारमधील लहान मुलांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख ८४ हजार ५०० रुपये, असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या स्वाधीन केला.

घटनेची माहिती मिळताच डायल ११२, क्यूआरव्ही पथक, महामार्ग पोलिस आणि वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक तुषार गरुड, हवालदार प्रवीण गुंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. मध्यरात्री जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, सिन्नरचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार आणि एमआयडीसीचे सुनील बडगुजर यांनीही घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशीष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथके संशयितांचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.

Maharashtra TimesSurgana Crime: मध्यरात्री साधला डाव, सुरगाण्यात वृद्ध दाम्पत्याला निर्घृणपणे संपवलं, नातवासह नातसून पोलिसांच्या ताब्यातव्यावसायिकाकडून स्वसंरक्षणार्थ गोळीबाराची चर्चा
पहिल्या घटनेनंतर मध्यरात्री सुमारे १.४० वाजता मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या मोहम्मद फरान (वय ३०) यांच्या कारचे (एमएच १२ टीके ५८२३) टायरही धारदार वस्तू टाकून फोडण्यात आल्याचे सांगितले जाते. कार थांबताच चार ते पाच जणांनी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरोडेखोर हे फरान यांच्या दिशेने धावल्याने त्यांनी परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन राउंड फायर केल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही.

अन्य वाहनेही लक्ष्य
या टोळीने महामार्गावरील आणखी दोन वाहनांनाही अशाच पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. टायर पंक्चर करून वाहन थांबवायचे आणि त्यानंतर प्रवाशांना घेरून लुटायचे, अशी दरोडेखोरांची पद्धत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Maharashtra TimesShiv Sena vs BJP : शिवसेनेकडील खात्यांमध्ये CMO ची ढवळाढवळ, मंत्र्यांची शिंदेंकडे जाहीर नाराजी, रिक्षाचालकांच्या मराठीला मुदतवाढ मिळताच कडेलोटबंदूक जवळ होती म्हणून बचावलो…

समृद्धी महामार्गावरील लुटीच्या प्रयत्नातून नांदेडचे व्यावसायिक मोहम्मद फरान (वय ३०) कुटुंबासह थोडक्यात बचावले. मध्यरात्री सुमारे १.४० वाजता ते पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा आणि चालकासह कारने (एमएच १२ टीके ५८२३) मुंबईहून नांदेडकडे जात होते. अचानक टायर फुटल्याचा आवाज झाल्याने त्यांनी सुमारे एक किलोमीटर पुढे जाऊन कार थांबवली.

चालक टायर बदलत असताना अंधारातून चार ते पाच जण धारदार शस्त्रे घेऊन कारकडे धावत आले. त्यांनी चालकाला धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पुढचा निशाणा कुटुंब असू शकते, हे लक्षात येताच फरान यांनी कमरेला असलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन गोळ्या झाडल्याचे सांगितले. गोळीबाराचा आवाज होताच दरोडेखोर महामार्गावरून खाली उतरून अंधारात पसार झाले. काही वेळात महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. फरान हे नांदेड येथील फोर्ड कारचे डीलर आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षात तब्बल ७० हजार किमी प्रवास समृद्धी महामार्गावरून केल्याचे ते सांगतात. त्यामुळे हा मार्ग त्यांच्यासाठी नवा नाही. मात्र, कुटुंबासह आलेला हा अनुभव त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारा ठरला.

घटनेचे गांभीर्य सांगताना फरान म्हणाले, ‘माझ्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होती, म्हणून त्या क्षणी स्वसंरक्षणासाठी गोळीबार करता आला. माझ्या जागी अन्य कोणी असते आणि त्याच्याकडे कोणतेही संरक्षणाचे साधन नसते, तर त्या कुटुंबाच्या जीवाचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही.’ ‘कुटुंब सुरक्षितपणे प्रवास करू शकेल, अशी हमी या महामार्गावर कधी मिळणार?’ असा सवालही फरान यांनी उपस्थित केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत