Headlines

Political clash heats up between chhagan bhujbal and girish mahajan in nashik; आधी गिरीश महाजनांचा टोमणा, नंतर भुजबळांनीकडून सव्याज परतफेड; मुख्यमंत्र्यांसमोरच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी


म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ याच्यात रंगलेली जुगलबंदी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा उघड झाली. ‘भुजबळसाहेब, आम्हाला जळगावचे म्हणून बघू नका. आमचे काम बघा’, असा टोला महाजन यांनी भुजबळ यांना एका कार्यक्रमात लगावला, तर मुख्यमंत्री रस्तेमार्गाने नाशिकला येणार होते. त्यामुळे नाशिकचे रस्ते टकाटक झाले असून, मुख्यमंत्र्यांनी महिन्यातून एकदा यायला पाहिजे, अशा शब्दांत भुजबळांनी टोलेबाजी करीत, महाजनांचे उट्टे काढले.

महाजन- भुजबळांच्या टोलेबाजीचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंहस्थाच्या कामांमुळे नाशिककरांची गैरसोय झाली असून, त्रासाबद्दल मी जनतेची जाहीर क्षमा मागतो असे सांगत, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नाशिकमध्ये ‘सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम’ कार्यक्रम झाला. तत्पूर्वी, फडणवीस, भुजबळ आणि महाजन यांच्या उपस्थितीत मविप्रच्या कृषी महाविद्यालयाचे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन झाले. या वेळी ‘मी पालकमंत्री म्हणून काम करतोय. तुम्ही माझ्या कामाकडे बघा. माझ्याकडे बघू नका बरंका भुजबळसाहेब!’ असा चिमटा महाजनांनी काढला. यानंतर भुजबळ साहेबांचे भाषण आहे की नाही, माहीत नाही; नाही तर ते मला टोमणा मारतील, असेदेखील त्यांनी म्हटले.

महाजनांच्या टोमण्याची परतफेड भुजबळांनी पुढच्या कार्यक्रमात सव्याज केली. ‘नाशिकचे रस्ते आज टकाटक झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिन्यातून एकदा नाशिकला यायला पाहिजे,’ असा टोला भुजबळांनी नाशिकमधील रस्त्यांच्या कामांवरून लगावला. आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री मोटारीने नाशिकपर्यंत आले. त्यांचे खूप खूप आभार. जागोजागी पोलिसही आहेत. अजिबात ट्रॅफिक जाम होऊ देत नाहीत असे सांगत, मुख्यमंत्र्यांना दर महिन्याला नाशिकला बोलवत जा, असा टोला भुजबळांनी लगावला.

रस्ते कामांवरून नाशिककरांची नाराजी आणि त्यावरून भुजबळ-महाजनांच्या टोलेबाजीनंतर मुख्यमत्री फडणवीस यांनी, एकाच वेळी अनेक कामे होत असल्यामुळे नाशिककरांना त्रास होत असल्याची प्रांजळ कबुली दिली. या त्रासाबद्दल मी जनतेची जाहीर क्षमा मागतो असे सांगत, आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाची परिस्थिती असल्याने डांबराचा तुटवडा निर्माण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘यामुळे रस्त्यांच्या कामात अडथळे आले. मात्र, कुठेही समन्वयाचा अभाव नाही,’ असे फडणवीस म्हणाले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत