![]()
मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये आल्यामुळे येथील रस्ते चांगले झाले, अशी कोपरखळी मंत्री छगन भुजबळ यांनी लगावली. झालं असं की एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आलेले. यावेळी ते मोटारीने नाशिकमध्ये आले यासाठी भुजबळांनी त्यांचे आभार मानले. यावेळी खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भुजबळांनी केलेल्या मिश्किल वक्तव्याने उपस्थित सगळेच हसू लागले.
Source link
मुख्यमंत्री येताच नाशिकचे रस्ते टकाटक झाले; भुजबळांची फटकेबाजी, फडणवीसही हसले
