साखरेच्या वाढत्या किंमती पाहता देशभरातून विविध अंदाज बांधले जात आहेत. देशातील बहुतेक जणांनी तर इथेनॉलमुळेच साखरेच्या किंमतीत वाढ झाल्याचे जाहीर केले होते. नंतर सरकारने हे दावे फेटाळून लावले होते. आता देशाची प्रमुख साखर उद्योग संस्था इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर असोसिएशन (ISMA) नेही इथेनॉलसंबंधित या दाव्याला फेटाळून लावले आहे. तसेच साखरेच्या किंमतीत होणाऱ्या वाढीसंदर्भात विविध दोन वेगवेगळे दावे केले आहेत.
काय आहे देशातल्या प्रमुख साखर संस्थेचे म्हणणे?
ISMA ने पॅनिक बाईंग हे मुख्य कारण सांगितले आहे. बाजारात साखरेचे भाव वाढणार आहेत हे ऐकून अनेक थोक खरेदीदारांनी साखरेचा मोठा साठा आधीच खरेदी करून ठेवला. ही साखरेची खरेदी इतकी मोठी होती की देशाच्या बाजारपेठेत व्यवहारासाठीची साखर कमी झाली, असा दावा ISMA ने केला आहे. एकंदरीत, ISMA च्या मते देशातला साखर कुठेही गेला नाही, फक्त तो बाजारात नसून मोठ्या थोक खरेदीदारांच्या गोदामात आहे.
इतकेच नव्हे तर ISMA ने साखरेच्या किंमत वाढीविषयी आणखीन एक महत्वाचे कारण सांगितले आहे. ISMA ने दावा केला आहे की देशात साखरेचा तुटवडा नसून यंदा उत्पादन फक्त कमी झाले आहे. यंदाचे शुगर सीझन सुरू होण्यागोदार 345 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. पण हवामान, महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशात पिकांसबंधीत अडचणी तसेच इतर काही अडचणींमुळे 345 लाख टनाचा अंदाज 309 लाख टनावर आला. म्हणजे या वर्षी साखरेचे उत्पादन कमी झाले.
Property Ownership: तुमची सहमती असो की नसो, काही परिस्थितींमध्ये सरकार जमीन जप्त करू शकते! भूसंपादनाचे नियम, कायदा समजून घ्याउत्पादन कमी तर देशात साखरेचा तुटवडा का नाही?
यंदा देशात साखरेचे उत्पादन कमी जरी असले तरी गेल्या वर्षाचा 50 लाख टन साखर साठा देशाकडे शिल्लक होता. तसेच यंदाच्या वर्षाचा 35 लाख टन साखर साठा शिल्लक राहील असा अंदाज आहे. एकंदरीत, यंदाच्या वर्षी साखरेचे उत्पादन जरी कमी झाले असले तरी कमतरता भरून काढण्यासाठी गेल्या वर्षीच्या उत्पादनातला शिल्लक राहिलेला सुमारे 50 लाख टन साठा देशाकडे आधीच होता.

