Headlines

आमच्यात बहरणारी ही लव्हस्टोरी, आयुष्यातला सुंदर अध्याय; आई झाल्यानंतर तेजस्विनी लोणारीची पहिलीच गोड पोस्ट


मुंबई: मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या आयुष्यात एका अध्यायाची सुरुवात झाली आहे. तेजस्विनी आणि पती समाधान सरवणकर यांच्या आयुष्यात आता एका चिमुकल्याची एन्ट्री झाली आहे. दोघांनी ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. समाधान सरवणकर यांनी खास पोस्ट शेअर करत हा आनंद शेअर केला होता तर, तेजस्विनीनी देखील आई झाल्यानंतर तिचा आनंद व्यक्त केला. आई झाल्यानंतर तेजस्विनीनं पहिल्याच शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

आई झाल्यानंतर तेजस्विनीनं सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत डोहाळे जेवणाचे खास फोटो शेअर केले आहेत, ज्यानं सध्या तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Maharashtra TimesTejaswini Lonari blessed with Baby Boy: तेजस्विनी लोणारीचं चाहत्यांना गोड सरप्राइज, समाधान सरवणकर झाले बाबा;घरी आला छोटा पाहुणा, खास पोस्ट व्हायरल
“फक्त आम्ही दोघे… आणि आमच्यात फुलणारी लव्हस्टोरी”

तेजस्विनीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “फक्त आम्ही दोघे… आणि आमच्यात बहरणारी, वाढणारी ही सर्वात छोटी अन् मोठी लव्हस्टोरी. आमचा हा प्रवास, आमचे प्रेम, आमची कुटुंबे आणि आमच्या आयुष्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी येणारा तो छोटासा जीव… हे सर्व साजरी करणारा तो एक अत्यंत सुंदर दिवस होता.”

तिनं पुढं लिहिलं की, आज जेव्हा मी या फोटोंकडं पुन्हा पाहते, तेव्हा खूप खास वाटतं, कारण तेव्हा आम्ही दोघेच होतो. आम्ही आमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या चिमुकल्या बाळाची, आमच्या मुलाची स्वप्ने पाहत होतो. आमचं हृदय आणि आमचं आयुष्य पुढं किती पटीने प्रेमानं भरून निघणार आहे, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या बदलाचा उल्लेख करत तिनं लिहिलं की ,दोघांपासून तिघे होण्याचा हा प्रवास… आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अद्भुत अध्याय आहे.

Maharashtra TimesHarman Baweja Transformation: कोण होतास तू काय झालास तू! बॉलिवूडच्या या हँडसम हंक अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण, VIDEO व्हायरलचाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

तेजस्विनीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिचे चाहते, मित्र-मैत्रिणी आणि मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी तिला आई झाल्याबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा”, “बाळ आणि आई दोघांनाही उत्तम आरोग्य लाभो”, अशा अनेक प्रेमळ कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

बिग बॉस मराठी‘च्या चौथ्या पर्वातून घराघरांत पोहोचलेल्या तेजस्विनी लोणारीनं आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी नेहमीच पसंत केलं आहे. आता अभिनयाच्या कौशल्यासोबतच ती आईपणाची ही नवी आणि जबाबदारीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत