देशाच्या परकीय चलनच्या साठयात जवळपास 73 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. ही मोठी वाढ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या swap योजनेच्या माध्यमातून झाली आहे. RBI ने जून 2026 महिन्यात Forex Swap Facility ला सुरुवात केली होती. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत आरबीआईने अब्जो डॉलर्सची रक्कम उभी केली आहे. हे Forex Swap Facility नक्की असते काय? जाणून घ्या.

पण ही Forex Swap सुविधा नक्की आहे तरी काय?
परदेशी चलन भारतात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून Forex Swap Facility जून 2026 महिन्यात सुरू करण्यात आली. या सुविधेच्या माध्यमातून देशाच्या डॉलर साठयात वाढ करण्याचा उद्देश होता. या सुविधेत तीन मार्ग आहेत. FCNR (B) Deposits, OFCB आणि ECB.
परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना बचत म्हणून FCNR (B) Deposits ची सेवा दिली जाते. या सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एनआरआई नागरिकांना पैसे ठेवण्यासाठी भारताकडून विशेष जागा उपलब्ध होते. या सेवेच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात परकीय चलन येते. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फॉरेक्स Swap व्यवस्थेअंतर्गत एका ठराविक वेळेकरिता FCNR (B) Deposits मध्ये जमा झालेले परकीय चलन रुपयांमध्ये Swap करता येते. एकंदरीत, FCNR (B) Deposits ठेवणाऱ्या बँकांकडे ज्या परदेशी रक्कमा येतात ते भारतीय रिझर्व्ह बँक स्वतःकडे ठेवते आणि त्या बदलात त्या बँकांना भारतीय रुपया देण्यात येतो. एकंदरीत, बँकांकडून NRI चे परकीय चलनांमध्ये असणारे डिपोजिट RBI स्वतः जवळ घेते आणि त्या बदलात बँकांना रुपया देते.
फॉरेक्स Swap व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या OFCB हा पर्याय भारतीय बँकांनी परदेशातून मिळवलेले कर्ज आहे. भारतीय बँका परदेशातून परकीय चलनात कर्ज मिळवतात. हे परकीय चलन भारतात आल्यावर आरबीआई कडून त्यांची रुपयांमध्ये अदलाबदल केली जाते. परदेशातून कर्ज आणलेले डॉलर्स बँका आरबीआईकडे सोपावतात त्या बदलात आरबीआई त्यांना बाजारभावानुसार रुपया देते.
फॉरेक्स Swap व्यवस्थेतील ECB या पर्यायात देशातील कंपन्या परदेशातून कर्ज आणतात. हे कर्ज परकीय चलनात असते. RBI कडून या चलनाची रुपयांमध्ये अदलाबदल केली जाते. एकंदरीत, FCNR (B) Deposits, OFCB आणि ECB हे तिन्ही देशात परकीय चलन आणण्याचे मार्ग आहेत. एका ठराविक वेळेसाठी या तिन्ही मार्गातून आलेले परकीय चलन आरबीआईकडून रुपयांमध्ये Swap करण्यात येते. ही Swap करण्यात आलेली रक्कम, आरबीआईची मालमत्ता नसते. भविष्यात आरबीआईला ते परकीय चलन परत करावे लागते.
आयकर विभागाच्या नोटिशीवर असतील हे कलम तर आधीच व्हा सावध! जाणून घ्या प्रत्येक सेक्शनच्या नोटीसचा अर्थआता देशाच्या परकीय चलन साठयात आरबीआईच्या फॉरेक्स Swap Facility अंतर्गत FCNR (B) Deposits माध्यमातून 65.397 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. OFCB च्या माध्यमातून एकूण 4.860 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे तर ECB या मार्गातून एकूण 2.591 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. एकंदरीत, आरबीआईने Swap Facility अंतर्गत आतापर्यंत एकूण 72.848 अब्ज डॉलर्स भारतात आणले आहेत. या सुविधेत सगळ्यात मोठा योगदान एनआरआई यांच्या ठेवीतून आले आहे. जमा झालेल्या रक्कमेत 90% वाटा FCNR (B) Deposits च्या माध्यमातून आला आहे.

