Headlines

Star Pravah Serial : We Are Signing Off! स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका लवकरच संपणार; 2 वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप


Star Pravah Serial Going To Off Air : स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका संपणार असून कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

Yed Lagla Premacha Going To Off Air
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ येड लागलं प्रेमाचं ‘ ही लोकप्रिय लवकरच बंद होणार आहे. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेनंतर आता राया आणि मंजिरीची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून मालिकेच्या संपूर्ण टीमनं शूटिंगचा शेवटचा दिवस उत्साहात साजरा केला आहे.

२ वर्षांचा प्रवास अखेर थांबणार

२७ मे २०२४ रोजी ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेत विशाल निकमनं रायाची भूमिका साकारलेली आणि पूजा बिरारीनं मंजिरीची भूमिका साकारली होती. विशाल आणि पूजाची नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. गेल्या दोन वर्षांत या मालिकेत अनेक रंजक वळणं आली. अनेक लोकप्रिय कलाकारांचे कॅमिओही मालिकेत पाहायला मिळाले.

एकवेळ सायली आम्हाला सोडवेल पण प्रिया नाहीच! ‘ठरलं तर मग’ मालिकेतील खलनायकांसोबत गप्पा

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमनं एकत्र ग्रँड सेलिब्रेशन केलं. सेटवर केक कापून सर्वांनी या प्रवासाची गोड सांगता केली. मालिकेतील प्रमुख कलाकारांसह तांत्रिक टीमही या वेळी उपस्थित होती. ‘We Are Signing Off!’ असं म्हणत कलाकारांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या टीममधील साहिल कुमारनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘काल शुटिंग संपलं आणि आज जाणवतंय की फक्त शुटिंग नाही तर एक सवय संपली आहे. रोज भेटणं, एकत्र काम करणं, हसणं-मस्करी, कळलंच नाही, कधी ही माणसं फक्त टीममधील न राहता आपली माणसं बनली. आजपासून तो सेट नाहीये, ती रोजची धावपळ नाहीये, पण, प्रत्येक कोपऱ्यात काही ना काही आठवणी नक्कीच आहेत.’

Yed Lagla Premacha

‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत विशाल आणि पूजासोबत नीना कुलकर्णी, अतिशा नाईक, शंतनू मोघे आणि वैभव चव्हाण यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

Maharashtra TimesPrajakta Mali : ‘मी अधिकृतपणे क्रूरतामुक्त झालेय’, वाढदिवशी प्राजक्ता माळीचा महत्वाचा निर्णय, पोस्ट करत दिली माहिती
गेल्या काही महिन्यांपासून ‘येड लागलं प्रेमाची’ ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित केली जात होती. उशिराची वेळ असूनही मालिकेनं चांगला टीआरपी टिकवून ठेवला होता. त्यामुळे मालिका बंद होत असल्याचं समजताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्टार प्रवाह वाहिनीकडून लवकरच मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो शेअर केला जाईल. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचे ७६१ भाग झाले आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा