Raja Chaudhary Shweta Tiwari Divorce : राजा चौधरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटानंतर वाटाघाटीच्या वेळी नेमकं काय झालेलं याबाबत स्पष्ट सांगितले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्वेता तिवारीचा Ex नवरा, राजा चौधरी याने नुकतेच अभिनेत्रीवर धक्कादायक आरोप केले आहेत. आपली मुलगी पलक तिवारी हिच्यावरील हक्क सोडण्याच्या बदल्यात 93 लाख रुपये किमतीचा फ्लॅट स्वीकारल्याच्या प्रकरणावर त्याने अखेर मौन सोडले आहे. घटस्फोटाच्या तडजोडीदरम्यान श्वेताने सुमारे 93 लाख रुपये किमतीचा एक ‘वन-बेडरूम’ फ्लॅट राजा चौधरीच्या नावावर केला होता. त्या बदल्यात, राजाने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि मुलगी पलक तिवारी हिची कस्टडी मागणार नाही, असे मान्य केले.
यापूर्वी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिवारीने खुलासा केला होता की, जेव्हा कायदेशीर टीमने ती प्रॉपर्टी राजा चौधरी आणि पलक तिवारी यांच्या संयुक्त मालकीची ठेवण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा राजाने तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्याऐवजी, त्याने ती प्रॉपर्टी पूर्णपणे स्वतःच्या नावावर करून घेण्याची मागणी केली. त्याच्या या निर्णयामुळे श्वेताला मोठा धक्का बसला. तिने मुलाखतीत सांगितले, “जेव्हा राजा म्हणाला, ‘प्रॉपर्टीसाठी मी माझ्या मुलीचा त्याग करेन; मला तो फ्लॅट दे आणि मी तुला घटस्फोट देईन’, तेव्हा मला धक्काच बसला.”
आता सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका नवीन मुलाखतीत राजा चौधरीने आपली बाजू मांडली आहे. तो म्हणाला की, “आम्ही 2007 मध्ये विभक्त झालो. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात गेले. 2007 ते 2012 या काळात, मला नाही वाटत की ती दहा वेळा तरी न्यायालयात हजर राहिल्या असतील; याउलट, मी प्रत्येक सुनावणीला उपस्थित होतो.” त्याने असाही दावा केला की, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुलगी पलक हिला एका निश्चित ठिकाणी भेटण्याची परवानगी होती, परंतु श्वेता तिला कधीच तिथे घेऊन आली नाहीत.
त्याने असेही सांगितले की, या काळात तो इतर काही समस्यांमध्ये अडकला होता, ज्यामुळे त्याला राहण्यासाठी जागा शोधणे अशक्य झाले. त्याने सांगितले, “परिस्थिती अशी झाली होती की मी पूर्णपणे वैतागलो होतो. मला आता कशाचीही इच्छा उरली नव्हती. कोणीही मला भाड्याने घर द्यायलाही तयार नव्हते.” राजाने हे देखील नमूद केले की, तो 1-बीएचके फ्लॅट त्याच्या वडिलांनी श्वेतासोबत लग्न झाल्यानंतर विकत घेतला होता.
फ्लॅट सुरुवातीला 9 लाख रुपयांना खरेदी केला होता
राजने सांगितले की, हा फ्लॅट सुरुवातीला 9 लाख रुपयांना खरेदी करण्यात आला होता. त्याच्या वडिलांनी ‘डाऊन पेमेंट’ केले होते, तर ईएमआय भरण्याची जबाबदारी त्याने आणि श्वेताने मिळून सांभाळली होती. “मी म्हणालो, ‘तू मला हा फ्लॅट दे आणि तुझे साम्राज्य, तुझी मुले आणि तुला हवे ते सर्व तू स्वतःकडे ठेव. फक्त माझ्या आयुष्यातून दूर हो… मला थोडी शांतता मिळू दे.’
श्वेता तिवारी सुरुवातीला या अटीवर सहमत होती
त्याने असाही दावा केला की, श्वेता सुरुवातीला राजाच्या या अटीवर सहमत होती, परंतु नंतर तिने या प्रकरणाचे स्वरूप फिरवून राजाच्या विरोधात परिस्थिती निर्माण केली. तो म्हणाला, “हे प्रकरण ‘त्यागा’पर्यंत कसे काय पोहोचले? जर एखादा पुरुष निवाऱ्याच्या शोधात असेल जिथे तो शांततेने राहू शकेल तर त्यात नक्की त्याग कशाचा आहे? आणि मूल की संपत्ती यांपैकी एकाची निवड करणे, या दोन गोष्टींची तुलनाच कशी काय केली जाऊ शकते?”
राजाचा दावा
राजाचे म्हणणे आहे की, श्वेताचे आरोप तेव्हाच ग्राह्य धरले जाऊ शकले असते जर तिने त्यांच्या संयुक्त मालकीच्या सर्व मालमत्तांचा ताबा घेतला असता. त्याऐवजी, त्याने असा दावा केला की, स्वतःचे पैसे गुंतवलेले असूनही, त्याने त्यांनी एकत्रितपणे खरेदी केलेल्या मालमत्तांमधील आपला हिस्सा सोडून दिला.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा