Headlines

Shubhangi Atre : ‘नवऱ्याचं दारूचं व्यसन वाढलं, स्वभाव चिडचिडा झाला’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितलं लग्नाच्या 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचं कारण


Shubhangi Atre On Divorce : लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी अत्रेचा लग्नाच्या १९ वर्षांनी घटस्फोट झाला. एका मुलाखतीमध्ये शुभांगीनं घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे.

Shubhangi Atre On Divorce
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘भाभीजी घर पर हैं!’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे आणि पीयूष पुरे यांचा लग्नाच्या १९ वर्षांनी घटस्फोट झाला. या निर्णयानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगीनं तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.

लग्न आणि घटस्फोटाचं कारण

शुभांगी अत्रे आणि पीयूष पुरे यांचं २००३ मध्ये लग्न झालेलं, त्यावेळी शुभांगी २२ वर्षांची होती. कॉलेजच्या दिवसांत इंदूरमध्ये त्यांची भेट झाली होती आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या भेटीगाठी होत असत. Hauterrfly या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत शुभांगीनं सांगितलं की, तिनं दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करावं, अशी तिच्या घरच्यांची अपेक्षा होती. परंतु तिनं आधीच पीयूषसोबत लग्न करायचा निर्णय घेतला होता.

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

पतीपासून वेगळं होण्याच्या निर्णयाविषयी बोलताना शुभांगी म्हणाली की, ‘लग्नाच्या काही वर्षांनी पीयूषला दारूचं प्रचंड व्यसन लागलेलं. मला माहीत होतं की, त्याला दारू प्यायला आवडते. आम्ही कधी कधी एकत्र प्यायचो. पण हे व्यसन कधी इतकं वाढलं, हे माझ्या लक्षातच आलं नाही. लग्न म्हणजे दोन व्यक्तींनी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या एकत्र मोठं होणं असतं. पण जेव्हा पीयूषचं व्यसन वाढलं, तेव्हा त्याचा स्वभाव चिडचिडा बनला. मी त्याला बाहेर जाण्यास आणि त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्यास प्रोत्साहन द्यायचे, पण तसं कधी घडलंच नाही. तो अधिकाधिक दारूच्या आहारी गेला.’

Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra Fame Viraj Jagtap : बालनाट्यापासून सुरुवात, अभिनयात करिअर करण्याचं स्वप्न उराशी पण आर्थिक तंगी, हास्यजत्रेनं पालटलं नशीब; डोळे पाणावणारा विराज जगतापचा संघर्ष
लग्नात तुझा छळ झाला होता का, असं विचारलं असता शुभांगी म्हणाली की, ‘नाही, माझा कोणताही छळ झाला नाही. आमचा घटस्फोट परस्पर संमतीनं झाला.’ दरम्यान, शुभांगीचा एक्स पती पियुषचं १९ एप्रिल २०२५ रोजी निधन झालं.

Maharashtra TimesPrashant Damle : ‘अर्धवट माहितीवर त्यांची गाडी ढकलतात, NEET चा फुल फॉर्म माहित नसेल तर घोषणा देऊन काय उपयोग?’, जेन झींबद्दल प्रशांत दामलेंचं वक्तव्य

शुभांगी अत्रेचं वर्क फ्रंट

शुभांगीनं तिच्या अभिनय करिअरची सुरुवात ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतून केली. २००७ मध्ये प्रसारित झालेल्या ‘कस्तुरी’ या मालिकेनं शुभांगीला मोठी ओळख मिळवून दिली. एकता कपूर निर्मित या मालिकेत करण पटेल आणि शुभांगी मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘भाभीजी घर पर हैं!’ या मालिकेत ‘अंगूरी भाभी’ची लोकप्रिय भूमिका साकारून शुभांगी घराघरांत पोहोचली. जवळपास ९ वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर तिनं २०२५ मध्ये ही मालिका सोडली. शुभांगीनं ‘चिडिया घर’, ‘अधुरी कहानी हमारी’, ‘हवन’ आणि ‘दो हंसों का जोडा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा