Burger King customer fight: बर्गर किंगमध्ये पिण्याच्या पाण्यावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. ग्राहकाने पाणी मागितले, पण कर्मचाऱ्याने पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होत असून संतापलेले नेटकरी कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करत आहेत.

भांडण का वाढलं?
हा व्हिडीओ @WarlockHindu या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ग्राहकाने पिण्याचं पाणी मागितलं होतं. पण दुकानातील कर्मचाऱ्याने पाणी देण्यास नकार दिला. त्यानंतर ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, ग्राहकाने “तुझा व्हिडीओ काढून मी तक्रार करणार” अशी धमकी दिली. पण कर्मचाऱ्यानेही “बिनधास्त व्हिडीओ काढ आणि कोणालाही पाठव” असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे हा वाद आणखी वाढला.
व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड चिडले आहेत. कर्मचाऱ्यावर टीका करत त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी ते बर्गर किंगकडे करत आहेत. वास्तविक, पाणी मिळू शकत नाही हे त्याने अगदी शांतपणे सांगितलं असतं किंवा काही सेकंद खर्च करून त्या ग्राहकाला पाणी दिलं असतं, तर कदाचित हा वाद टाळता आला असता. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

