Headlines

Shiv Sena Balasaheb Chandere Opened Fire Over Land Dispute at Midnight Pune Bavdhan; बांधकाम साइटवर गप्पा मारताना शा‍ब्दिक चकमक, जमिनीच्या वादातून मध्यरात्री पुण्यात जोरदार राडा; शिंदे गटाच्या नेत्याकडून गोळीबार


Pune Shivsena Balasaheb Chandere Shot Dead : जमिनीच्या वादातून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या जिल्हाप्रमुखाने पिस्तुलातून गोळीबार केला. हा प्रकार काल गुरुवारी मध्यरात्री सुस-नांदे रोडवरील एका बांधकाम प्रकल्पावर घडला. बावधन पोलिसांनी जिल्हाप्रमुखासह दोघांना अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

Pune Shivsena Balasaheb Chandere Firing
पुणे बाळासाहेब चांदेरे गोळीबार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जमिनीच्या वादातून शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (२ जुलै) मध्यरात्री सूस-नांदे रस्त्यावरील बांधकाम साइटवर घडला. बावधन पोलिसांनी चांदेरे यांच्यासह एका साथीदाराला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

बिल्डिंगसमोरील बांधकाम साइटबाहेर गप्पा

नागेश मोहन राठोड (वय २१, रा. नऱ्हे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाळासाहेब चांदेरे (वय ५४, रा. सूस गाव) आणि संदेश माने (वय ३७, रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागेश राठोड, राहुल प्रेम सरकार, आणि मेहबूब हबीब शेख हे ओम पॅराडाइज बिल्डिंगसमोरील बांधकाम साइटबाहेर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे रात्री एकच्या दरम्यान बाळासाहेब चांदेरे आले. यादरम्यान, संबंधित जमिनीच्या वादातून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर चांदेरे यांनी पिस्तूल काढले, त्यामुळे जीव वाचविण्यासाठी सर्वांनी पळायला सुरुवात केली. तेव्हा चांदेरे यांनी एक गोळी झाडली.

अनिल पवार यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर काल गुरुवारी दुपारी नगरपरिषदेसमोरच चार मुखवटाधारी हल्लेखोरांनी कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रसंगावधान राखून प्रतिकार केल्यामुळे पवार थोडक्यात बचावले असून त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेला एक सहकारी जखमी झाला आहे.

नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पवार हे नेहमीप्रमाणे नगरपरिषदेतील कामकाज आटोपून दुपारी कार्यालयाबाहेर पडले होते. नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते आले असता तोंडाला मास्क बांधलेल्या चार अज्ञात तरुणांनी त्यांना घेरलं. सुरुवातीला हाताने मारहाण करत हल्लेखोरांनी पवार यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार यांनी धाडसाने प्रतिकार केल्याने मोठी दुर्घटना टळली.

हल्ल्यादरम्यान पवार यांना मदत करण्यासाठी धावून गेलेल्या एका सहकाऱ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन अनिल पवार यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. ‘मी या हल्ल्यातून बचावलो असून पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी पवार यांनी केली आहे. या घटनेमुळे इंदापूरमध्ये राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.